मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लवकर लाईटर सापडला नाही अन् घरात गॅस पसरून स्फोट झाला; पुण्यातील चौघांसोबत भयानक घडलं

लवकर लाईटर सापडला नाही अन् घरात गॅस पसरून स्फोट झाला; पुण्यातील चौघांसोबत भयानक घडलं

जालिंदर जाधव हे स्वयंपाकासाठी गॅस चालू करत असताना त्यांना लाईटर लवकर सापडला नाही. या वेळेत गॅस घरात पसरला. काहीच वेळाच त्याचा स्फ़ोट झाला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे 26 नोव्हेंबर : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पुणे - सातारा महामार्गावरील वरवे खुर्द या गावातील एका घरात गॅसचा स्फोट झाला. या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले आहेत. स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटवत असताना ही दुर्घटना घडली. जखमींना खेड - शिवापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

उकळती भाजी साडेतीन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर पडली, अन्.., पुण्यातील थरकाप उडवणारी घटना

या दुर्घटनेत जालिंदर नारायण जाधव, रिद्धी संदीप शितोळे (वय 6), यश मोहन ताकवले (वय 11), संदीप बाळासो कदम (वय 34) हे जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर रिद्धीला पुढील उपचारासाठी पुण्यात पाठविण्यात आलं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सातारा महामार्गालगतच्या वरवे खुर्द या गावातील एका घरात ही घटना घडली. यात जालिंदर जाधव हे स्वयंपाकासाठी गॅस चालू करत असताना त्यांना लाईटर लवकर सापडला नाही. या वेळेत गॅस घरात पसरला. काहीच वेळाच त्याचा स्फ़ोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की त्यात त्यांच्यासह इतर 3 जण जखमी झाले आहेत.

तरुणाला आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण, मग दगडाने ठेचत गोळीबार; कोरेगाव पार्कमधील घटनेचा Shocking Video

घरात स्फोट झाल्याची बातमी कळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घेतली. यानंतर स्थानिकांनी मदत करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. जखमींना शिवापूर येथील श्लोक हॉस्पिलटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गॅसजवळ काम करताना अतिशय सावधगिरी बाळगणं गरजेचं असल्याचं या घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

First published:

Tags: Gas, Pune, Shocking news