मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उकळती भाजी साडेतीन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर पडली, अन्.., पुण्यातील थरकाप उडवणारी घटना

उकळती भाजी साडेतीन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर पडली, अन्.., पुण्यातील थरकाप उडवणारी घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या घटनेमध्ये एका साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा अंगावर उकळती भाजी पडली. या घटनेत हा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. घटना मावळातील पिंपोळी गावात नाथा पिंगळे यांच्या घरात घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Kiran Pharate

गणेश दुडम, प्रतिनिधी, मावळ 24 नोव्हेंबर : घरात लहान मुलं असतील तर पालकांना त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवावं लागतं. अनेकदा लहान मुलं नकळत असं काहीतरी करतात की त्यांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणं गरजेचं असतं. मात्र, अनेकदा अगदी क्षणभरात अशा काही दुर्घटना घडतात, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. मावळमधून सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेमध्ये एका साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा अंगावर उकळती भाजी पडली. या घटनेत हा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. घटना मावळातील पिंपोळी गावात नाथा पिंगळे यांच्या घरात घडली. घरात स्वयंपाक बनवण्याचं काम सुरू असताना या चिमुकल्यावर उकळती भाजी पडली. गरम भाजी अंगावर पडल्याने हा मुलगा गंभीर जखमी झाला.

उकळत्या वरणात पडून 5 वर्षीय बालकाचा मृत्यू; औरंगाबादमधील मन हेलावणारी घटना

साडेतीन वर्षीय चिमुकल्याला या घटनेनंतर लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सध्या पिंपरी चिंचवडच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेत हा मुलगा गंभीर जखमी झाला असल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

वरणात पडून झालेला चिमुकल्याचा मृत्यू -

आठवड्याभरापूर्वीच अशीच एक घटना औरंगाबादमधून समोर आली होती. यात उकळत्या वरणात पडून 5 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला. उकळलेल्या वरणाच्या भांड्यात पडल्याने हा चिमुकला गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरु असतानाच या 5 वर्षीय चिमुकल्याचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. योगीराज नारायण आकोदे असं या चिमुकल्याचं नाव होतं.

1500 फूट उंचीवर असलेल्या धबधब्यावर अंघोळ करत होते, पाय घसरला आणि...

योगीराज नारायण आकोदे हा 5 वर्षीय बालक आईसोबत खुलताबाद तालुक्यातील सोबलगांव येथे प्रदिप जाटवे यांच्याकडे आला होता. घरात पाहुणे आल्याने जाटवे यांच्याकडून घरात स्वयंपाकाची तयारी सुरु होती. सायंकाळी पाहुण्यांसाठी पाहुणचार सुरु असताना मृत बालक हा वरण बनविलेल्या भांड्याजवळ आला. यावेळी तोल जाऊन तो उकळत्या वरणाच्या भांड्यात पडला. यातच या बालकाचा मृत्यू झाला होता.

First published:

Tags: Pune news, Shocking news