जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / तरुणाला आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण, मग दगडाने ठेचत गोळीबार; कोरेगाव पार्कमधील घटनेचा Shocking Video

तरुणाला आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण, मग दगडाने ठेचत गोळीबार; कोरेगाव पार्कमधील घटनेचा Shocking Video

तरुणाला आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण, मग दगडाने ठेचत गोळीबार; कोरेगाव पार्कमधील घटनेचा Shocking Video

या भांडणामध्ये चक्क हवेत गोळीबारही करण्यात आला. पुण्यातील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे 25 नोव्हेंबर : पुण्यात गुन्हेगारी च्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हत्या, दरोडा, मारहाण यासह अनेक धक्कादायक घटना दररोज समोर येत आहेत. अशातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. यात पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये रात्री फायरिंगची घटना घडली आहे. व्याजासह पैसे परत करूनही सावकाराचं तरुणासोबत क्रूर कृत्य, पुण्यातील विचित्र घटना या घटनेत पूर्ववैमान्यातून दोन गटात राडा झाला. या भांडणामध्ये चक्क हवेत गोळीबारही करण्यात आला. पुण्यातील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे

जाहिरात

घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यात दिसतं, की काही आरोपी तरुणाला जबर मारहाण करत आहेत. सुरुवातीला ते त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतात. यानंतर यातील एक आरोपी बंदूक बाहेर काढतो आणि हवेत गोळीबार करतो. यानंतर सगळे मिळून तरुणाला बेदम मारहाण करतात. विशेष बाब म्हणजे ही घटना रस्त्यावरच घडली असून आजूबाजूला अनेक वाहने ये-जा करत असल्याचं दिसतं. गर्दीच्या ठिकाणीच ही धक्कादायक घटना घडली आहे. आधी पूर्ण गावातील लाईट बंद केल्या; मग चौकातच कोयत्याने हल्ला, भावाकडूनच 15 वर्षीय मुलाची हत्या आरोपी सोन्या दोडमणी याने त्याचेकडील कमरेला लावलेली बंदूक काढून त्यातून हवेत गोळीबार केला. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने 7 ते 8 वेळा तरुणाच्या तोंडावर हाताने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्याला जखमी केलं गेलं. यानंतर सगळे तिथून निघून गेले. मात्र, काही वेळाने यातील एक आरोपी पुन्हा घटनास्थळी आला आणि त्याने जखमी तरुणावर दगडाने वार केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेनंतर सर्व आरोपी तिथून पळून गेले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेत जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात