मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सेल्फी घेताना भरधाव ट्रेन आली आणि...जीवघेण्या Selfie चा थरार, पुण्याच्या तरुणाचा मृत्यू

सेल्फी घेताना भरधाव ट्रेन आली आणि...जीवघेण्या Selfie चा थरार, पुण्याच्या तरुणाचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

पुण्याच्या तरुणाला सेल्फी घेण्यासाठी केलेला स्टंट महागात पडला. सेल्फीचं वेड जीवावर बेतलं, भरधाव ट्रेन आली आणि....

हिंगोली : सेल्फी घेण्याचं वेड आजकाल खूप वाढलं आहे. कधी कुठे आणि कसा सेल्फी घ्यावा याचंही भान हल्ली विसरत चालले आहेत. सेल्फीचा हाच नाद जीवघेणा ठरू शकतो याची अनेक उदाहरण समोर येत असतानाही भान विसरून सेल्फी घेण्याचं प्रमाण काही कमी होत नाही.

गड-किल्ल्यांवर सेल्फीचा नाद भोवल्याचं किंवा धरण, नदीच्या ठिकाणी, समुद्राच्या ठिकाणी देखील सेल्फी काढताना तोल गेल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या. तरी देखील स्टंट करून सेल्फी घेण्याचा नाद काही सुटत नाही.

पुण्याच्या तरुणाला असाच एक स्टंट महागात पडला. रेल्वे रळावर उभं राहून सेल्फी काढणं त्याला भोवलं. पुण्याचा तरुण हिंगोलीतील रेल्वे स्थानकात रुळाच्या शेजारी उभं राहून सेल्फी घेत होता. भरधाव ट्रेन आली आणि सेल्फीचा हा नाद जीवावर बेतला.

नाशिक : चारित्र्यावर संशय, सततचा छळ अन् शेवटी झोपेत असतानाच घोटला पत्नीचा गळा

या तरुणाचा मृतदेह पोलिसांना मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मिळाला आहे. स्वप्निल लहाळे असं या मृत तरुणाचं नाव आहे. तो अवघ्या 20 वर्षांचा होता. सेल्फी काढण्याच्या नादात भरधाव रेल्वेशी त्याची धडक झाली असावी असं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे.

मॅट्रिमोनिअल साईटवरील ओळख पडली महागात, पुण्यात लग्नाचे आमिष देऊन घटस्फोटित महिलेवर बलात्कार

हिंगोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजता तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

First published:

Tags: Accident, Pune, Selfie photo