नाशिक, 16 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाने टोकाचे रुप धारण करत पतीने मोबाइल चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून तिचा खू केल्याची घटना घडली. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
वडाळा गावातील तैबानगर परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. या वादातून आरोपी रिजवान पठाण याने मोबाइल चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून तिला खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी रिजवान पठाण हा स्वत: इंदिरानगर पोलीस ठाण्यात हजर झाला. तसेच यावेळी त्याने पत्नीचा केल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली आणि घटनास्थळी धाव घेतली. ही घटना सोमवारी 15 ऑगस्टला घडली. मृताच्या पश्चात आठ वर्षांचा मुलगा, सहा वर्षांची मुलगी व चार वर्षांचा मुलगा आहे.
हुमेरा उर्फ मीनाज पठाण असे 29 वर्षीय मृताचे नाव आहे. हे दाम्पत्य इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळा गावातील तैबानगरमधील बाग-ए-तबस्सुम या अपार्टमेंटच्या 18 नंबरच्या फ्लॅटमध्ये राहत होते. आरोपी पती रिजवान इसाक पठाण (वय - 34) याने त्याची पत्नी हुमेरा उर्फ मीनाज पठाण हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता आणि तिचा शारिरिक-मानसिक छळ करत होता.
तीन महिन्यांपूर्वी पिडित विवाहितेला त्याने घरातून हाकलून लावले होते. यावेळी हुमेरा हिने त्याच्याविरूद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्जही दिला होता. त्यानंतर हुमेरा माहेरी होती. मात्र, यादरम्यान त्या पती-पत्नीमध्ये समझोता झाला आणि ती पुन्हा पतीकडे परत आली. सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हुमेराची सासू हुसनाबी यांनी मृत विवाहितेचा भाऊ गुलामगौस शकील शेख याला फोन केला आणि या घटनेबाबत सांगितले.
हेही वाचा - VIDEO:..अन् शेवटी ब्लँकेटची झोळी करून गरोदर महिलेला रुग्णालयात नेलं; नाशिकमधील मनाला चटका लावणारं दृश्य
यानंतर त्याने आपल्या परिवारासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्याची बहीण हुमेरा हिचा वायरने गळा आवळल्याचे आढळले. घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.