किशोर गोमाशे, वाशिम 22 ऑक्टोबर : दिवाळीला शुक्रवारपासूनच सुरूवात झाली आहे. त्यातच विकेंडही असल्याने अनेकांनी प्रवासाला सुरुवात केली आहे. गावानिमित्त घराबाहेर राहाणारे नागरिक आता आपल्या घराकडे निघाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच एसटी आणि खासगी बसमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच आता वाशिममधून एक अपघाताची घटना समोर आली आहे.
Womens Cricket Team Accident: महिला क्रिकेट संघाच्या बसला भीषण अपघात, मॅनेजरसह 5 जण जखमी या घटनेत नागपूरवरून परभणीला जाणाऱ्या भरधाव शब्रिज ट्रॅव्हल्सच्या गाडीचा अपघात झाला आहे. हा अपघात वाशिमच्या कारंजा शहरातील सावरकर चौकात झाला आहे. चौकात बस पलटी झाल्याने बसमधील 12 प्रवासी जखमी झाले आहेत. गाडी मध्ये 40 हून अधिक प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं अद्याप समोर आलं नाही. या अपघातानंतर पोलिसांनी गाडीच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. दिवाळी असल्याने ट्रॅव्हल्स क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जात आहेत. मात्र, चालक आणि त्याच्या सहकाऱ्याची तपासणी करण्याकडे परिवहन आणि पोलीस कानाडोळा करत असल्याचा आरोप केला जात आहे. सुसाट एक्स्प्रेसचा लोखंडी पत्रा तुटला अन् स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशांवर उडाला, एक जण जखमी मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात - मध्य प्रदेशातील रीवा येथे आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. या अपघातात ४० जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी होते आणि मृतांपैकी बहुतांश यूपी आणि बिहारमधील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.