जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सुसाट एक्स्प्रेसचा लोखंडी पत्रा तुटला अन् स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशांवर उडाला, एक जण जखमी

सुसाट एक्स्प्रेसचा लोखंडी पत्रा तुटला अन् स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशांवर उडाला, एक जण जखमी

सुसाट एक्स्प्रेसचा लोखंडी पत्रा तुटला अन् स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशांवर उडाला, एक जण जखमी

उंबरमाळी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. आज सकाळी मुंबईच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या धावत्या पटना एक्सप्रेसचा एक भाग निघळून तो प्रवाशाला लागला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

उंबरली, 21 ऑक्टोबर : ‘फलाटापासून दूर राहा एक भरधाव रेल्वे गाडी जाणार आहे’, अशी घोषणा आपण नेहमी रेल्वे स्थानकावर ऐकत असतो. पण, मुंबईपासून जवळ असलेल्या उंबरमाळी रेल्वे स्थानकावर एक विचित्र घटना घडली आहे. भरधाव पटना एक्स्प्रेसचा एक लोखंडी पत्रा तुडून उडाला आणि तो रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशांवर उडाला. या घटनेत एका प्रवाशाच्या पायाला दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उंबरमाळी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. आज सकाळी मुंबईच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या धावत्या पटना एक्सप्रेसचा एक भाग निघळून तो प्रवाशाला लागला. यात इतर शेकडो प्रवासी थोडक्यात बचावले आहे. हा भाग एका प्रवाशाच्या पायाला येऊन लागला असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले आहे. (विमानात घडलं असं काही की…; प्रवाशांमध्ये उडाला एकच गोंधळ, नक्की काय घडलं?) हा प्रवासी उंबरमाली स्थानकात लोकलची वाट पाहत उभा होता. याच वेळी मुंबईच्या दिशेने जाणारी भरधाव वेगानं पटना एक्सप्रेस उंबरमाळी स्टेशनवरून पास होत होती. याचवेळी तिचा एक लोखंडी पार्ट निखळून तो उडून थेट प्रवाशांच्या दिशेने आला, यात अनेक प्रवाशांनी आपला जीव वाचवला. मात्र एका प्रवाशाच्या पायाला हा भाग लागला आणि त्याच्या पायातून रक्तस्राव होऊ लागला. त्याला तात्काळ इतर प्रवाशांनी रुग्णालयात दाखल केलं. गाड्यांच्या कोणत्याही प्रकारच्या मेंटेनन्स केलं जात नसल्याने हा अपघात होत असल्याचा आरोप कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे. ( चेंबर साफ करताना 2 कामगारांचा मृत्यू; एकाचा शोध सुरू, पुण्यातील दुर्दैवी घटना ) दरम्यान, सोलापूर रेल्वे स्टेशनवर एका तरुणीकडून तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणीने रेल्वे स्टेशनवरील AC वेटिंग रूमच्या खिडक्यांची तोडफोड केली. या तरुणी रागाच्या भरात स्टेशनवर लोखंडी रॉडने तोडफोड केली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या तरुणीने वेटिंग रुमची तोडफोड का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, या तरुणीला सोलापूर रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. मात्र ही तरुणी मानसिक रुग्ण असल्याचे बोलले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात