मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बीडमध्ये भाजपला हादरे सुरूच, प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे आज 14 जणांचे राजीनामे!

बीडमध्ये भाजपला हादरे सुरूच, प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे आज 14 जणांचे राजीनामे!

 खा.डॉ प्रीतम मुंडे यांना भाजपकडून मंत्रिपदापासून डावलल्यानंतर जिल्ह्यात राजीनामासत्र सुरू झाले आहे.

खा.डॉ प्रीतम मुंडे यांना भाजपकडून मंत्रिपदापासून डावलल्यानंतर जिल्ह्यात राजीनामासत्र सुरू झाले आहे.

खा.डॉ प्रीतम मुंडे यांना भाजपकडून मंत्रिपदापासून डावलल्यानंतर जिल्ह्यात राजीनामासत्र सुरू झाले आहे.

बीड, 10 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे (beed mp pritam munde)  यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. बीडमध्ये (beed) राजीनामासत्र सुरू झाले आहे. आज जिल्ह्यात 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे.

'टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बीडमध्ये भाजपमध्ये मोठे राजकीय वादाला सुरुवात झाली आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांचे वजन बैलाला झेपेना, बैलगाडीतून कोसळले खाली

खा.डॉ प्रीतम मुंडे यांना भाजपकडून मंत्रिपदापासून डावलल्यानंतर जिल्ह्यात राजीनामासत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता 'हा' क्लेम करणं झालं अधिक सोपं

आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यासह जिल्ह्यातील भाजपच्या विविध 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

दरम्यान, प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने , बीड जिल्ह्यातील भाजप गटात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे. दोन दिवसात तब्बल 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याने, आता आणखीन किती राजीनामे येणार ? आणि आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार ? याकडे राजकीय वर्तुळातून लक्ष लागले आहे.

First published:

Tags: Beed news, Pankaja munde