मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /काँग्रेस कार्यकर्त्यांचे वजन बैलांना झेपेना, बैलगाडीतून भाई जगतापांसह कार्यकर्ते रस्त्यावर, पाहा Video.

काँग्रेस कार्यकर्त्यांचे वजन बैलांना झेपेना, बैलगाडीतून भाई जगतापांसह कार्यकर्ते रस्त्यावर, पाहा Video.

इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे वजन न पेलल्याने मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह सगळेच खाली कोसळले.

इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे वजन न पेलल्याने मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह सगळेच खाली कोसळले.

इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे वजन न पेलल्याने मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह सगळेच खाली कोसळले.

मुंबई, 10 जुलै : इंधन दरवाढीविरोधात (Fuel Inflation) बैलगाडी (Bullock cart) आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे (Congress Workers) वजन न पेलल्याने मुंबई अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यासह सगळेच खाली कोसळले. काँग्रेसने गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी मुंबईत बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र एकाच वेळी अनेक कार्यकर्ते गाडीत चढल्याने पंचाईत झाली.

नेमकं काय घडलं?

देशात एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सामान्य जनतेच्या मनात याबाबत असलेल्या संतापाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं मुंबईत बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी एक बैलगाडी आणण्यात आली. त्यात उभे राहून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. ‘देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’, अशा घोषणा देत कार्यकर्ते आंदोलन तापवू पाहात होते. मात्र त्याचवेळी दोन बैलांपैकी एका बैलाला त्यांचे वजन पेलणे कठीण होऊ लागले. काहीवेळाने तर बैल या गाडीपासून वेगळा झाला आणि बैलगाडी पलटी झाली. त्यामुळे बैलगाडीत उभे असलेले काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह सर्व कार्यकर्ते एका क्षणात गाडीतून रस्त्यावर पडले.

हे वाचा - मोठी बातमी: लस घेतली असेल तरच मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी?

कुणीही गंभीर नाही

या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाल्याची माहिती नाही. मात्र कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर कोसळल्याने काहीजणांना किरकोळ मुका मार तर काहीजणांना खरचटल्याची माहिती मिळत आहे. सर्वात खाली पडलेला एक कार्यकर्ता सुरुवातीला काही वेळ झोपून राहिला. त्यामुळे त्याला काही गंभीर इजा झाली असावी, असा संशय क्षणभरासाठी भाई जगतापांसह सर्वांनाच आला. मात्र काही क्षणातच हा कार्यकर्ता उठल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि हसतखेळत, घडलेल्या प्रसंगाची मजा लुटत कार्यकर्ते आंदोलनाच्या पुढच्या तयारीला निघून गेले.

First published:

Tags: Congress, Gas, Petrol and diesel