मुंबई, 17 जुलै, उदय जाधव : आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार गटाचे एकूण 15 आमदार उपस्थित होते, तर शरद पवार गटाच्या 9 आमदारांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीचे एकूण 53 आमदार आहेत, त्यापैकी अतुल बेनके यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर नवाब मलिक हे तुरुंगात असल्यामुळे त्यांचीही भूमिका स्पष्ट नाही. उर्वरीत आमदारांपैकी 32 आमदारंनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर 14 आमदार शरद पवार यांच्या गटात आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज अजित पवार गटाचे 15 तर शरद पवार यांच्या गटाचे एकूण 9 आमदार उपस्थित होते. अजित पवार गटात सहभागी आमदार १) संजय बनसोडे २) अनिल पाटील ३) दिलीप वळसे पाटील ४) आदिती तटकरे ५) छगन भुजबळ ६) हसन मुश्रीफ ७) सुनील शेळके ८) मकरंद पाटील ९) दिपक चव्हाण १०) इंद्रनील नाईक ११) अण्णा बनसोडे १२) सुनील टिंगरे १३) सुनील माने १४) धर्मरावबाबा अत्राम १५) दिलीप मोहिते पाटील १६) राजेंद्र शिंगणे १७) नितीन पवार १८) माणिकराव कोकाटे १९) दिलीप बनकर २०) नरहरी झिरवळ २१) दत्ता भरणे २२) संग्राम जगताप २३) शेखर निकम २५) राजेंद्र कारेमोरे २४) आशुतोष काळे २५) धनंजय मुंडे २६) बाळासाहेब आजबे २७) मनोहर चंद्रिकापुरे २८) राजेश पाटील २९) निलेश लंके ३०) प्रकाश सोळंके ३१) किरण लहामटे ३२) सरोज अहिरे शरद पवार गट १) जयंत पाटील २) जितेंद्र आव्हाड ३) रोहित पवार ४) प्राजक्त तनपुरे ५) सुनील भुसारा ६) बाळासाहेब पाटील ७) अनिल देशमुख ८) राजेश टोपे ९) संदीप क्षीरसागर १०) मानसिंग नाईक ११) चेतन तुपे १२) सुमन पाटील १३) दौलत दरोडा १४) अशोक पवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.