मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'तो दिवस लांब नाही, राज्यात भाजपचे सरकार येणारच'; राणे, आठवले पाठोपाठ आता दरेकरांचेही संकेत?

'तो दिवस लांब नाही, राज्यात भाजपचे सरकार येणारच'; राणे, आठवले पाठोपाठ आता दरेकरांचेही संकेत?

 केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मार्च-एप्रिल महिन्यात राज्यात भाजपचं सरकार (BJP Government) येणार असल्याचा दावा केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मार्च-एप्रिल महिन्यात राज्यात भाजपचं सरकार (BJP Government) येणार असल्याचा दावा केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मार्च-एप्रिल महिन्यात राज्यात भाजपचं सरकार (BJP Government) येणार असल्याचा दावा केला आहे.

  • Published by:  Chetan Patil

नंदुरबार, 27 नोव्हेंबर : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मार्च-एप्रिल महिन्यात राज्यात भाजपचं सरकार (BJP Government) येणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी देखील या संदर्भात सूचक विधान केलं आहे. "राज्यात भाजपचे सरकार येणारच. तो दिवस लांब नाही. फक्त ते आज येईल की उद्या याबाबत आम्ही भविष्यवाणी करणार नाही", असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. दरेकर आज नंदुरबार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

'आपला अनिल देशमुख होईल ही नबाव मलिकांना भीती'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी वसूली प्रकरणी ईडीने अटक केली आहे. या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप मलिकांनी अनेकवेळा केला आहे. त्यांच्या या आरोपांनाही प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा : 'महाराष्ट्रात मार्च-एप्रिल महिन्यात युतीचं पुन्हा सरकार येणार', रामदास आठवलेंनी फॉर्म्युलाच सांगितला

"आपला अनिल देशमुख होईल, अशी नबाव मलिकांना भीती आहे. आणि याच भितीतून ते केंद्रीय तपास यंत्रणेवर आरोप-प्रत्योराप करुन ग्राऊंड तयार करत आहेत. ईडीच्या कारवाया या आमच्या सांगण्यावरुन होत नाहीत. यंत्रणा आपल्या चौकटीत राहून काम करत आहेत. जर केंद्रीय तपास यंत्रणांनी चुकीचे काम केले तर न्याय व्यवस्था आहेच. राज्य सरकावर कुठलीही टीका केली तर ते लगेच केंद्राकडे बोट दाखवून आपलं अपयश लपवत आहे. राज्यातील सरकार हे महाविकास आघाडी या नावापेक्षाही वसुली सरकार म्हणून बदनाम झालेय", असा घणाघात प्रवीण दरेकरांनी केला.

दरेकरांनी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली

प्रवीण दरेकरांच्या हस्ते शहादा येथील सातपुडा तापी परिसर सहकारी कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ झाला. त्यानंतर त्यांनी नंदुरबार बस स्थानकाच्या बाहेर ठाण मांडून बसलेल्या संपकरी एसटी कामगारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजपचा कर्मचारी आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा असल्याचं सांगितलं. तसेत त्यांनी कारवाईचा बडगा उचलणार्‍या डेपो मॅनेजरला फोन करुन समज दिला.

'शरद पवारांनी विलीनीकरणाचा शब्द पाळावा'

प्रवीण दरेकरांनी दिवसभरात तीन बस स्थानकांना भेट देवून कामगारांची विचारपूस केली. या दरम्यानही दरेकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. "दडपशाहीने आंदोलक कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडू नये. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी विलीनीकरणाचा शब्द पाळावा. आम्ही सरकारचे अभिनंदन करु. आम्ही कर्मचाऱ्यांसोबत आहोत. मी कर्मचाऱ्यांच्या बाजूने चर्चेस तयार आहे. विलीनीकरण कसे होईल याचा शासनाला मार्ग दाखवतो. परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषदमध्ये काय बोलले हा निर्णय नाही. ज्या घोषणा केल्या त्याच्या अद्यापही लेखी शासन निर्णय नाही", असे दरेकर म्हणाले.

हेही वाचा : 'भावना गवळी स्वत: केलेल्या 100 कोटी घोटाळ्याची शिक्षा आईला देऊ नका', किरीट सोमय्यांचा घणाघात

"कोर्टाने विलीनीकरण करु नका, असे सांगितलेले नाही. समितीचे सारे सदस्य सरकारचेच आहेत. त्यामुळे निर्णय घ्या. समिती निर्णय घेईल. महाराष्ट्रातील प्रवासी सहनशील, एसटी कर्मचाऱ्यांसाठी ते त्रास सहन करत आहेत. त्यांचे पाठबळ आहे. तसेच एसटीत होत असलेली तोडफोड सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे का? हे तपासण्याची गरज आहे", असं दरेकर यांनी सांगितलं.

First published: