मुंबई 24 ऑक्टोबर : परतीच्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरुन शिंदे गट आणि भाजपने मात्र त्यांच्यावर टीका केली आहे. आता भाजप नेते आणि माजी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनीही उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ओला दुष्काळ म्हणजे काय हे उद्धव ठाकरे यांनी समजून घेतलं पाहिजे. मागण्या करत असताना त्यांना पीक काय, पीक खाली येतं का वर, खरीप काय, रब्बी काय हे समजून घेण्याची आवश्यकता आहे, अशी टीका करत प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही कळतं का? असा सवालही उपस्थित केला. Uddhav Thackeray : ‘ते आले, त्यांनी पाहिलं, पण त्यांना…’, ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर शिंदे गटाचा प्रहार उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबाद दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाणून परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानी पाहणी केली. याच दौऱ्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर प्रविण दरेकर यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, ठाकरेंना चिंता करायची गरज नाही. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50 हजार हेक्टरी देतो असं तुम्ही बोलला होता, ते केलं का? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, की शेतकऱ्यांना जे लागेल ते देऊ, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले आहेत की सरकारची तिजोरी खाली झाली तरी चालेल, पण शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचेल, असंही दरेकर यांनी यावेळी सांगितलं. ‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? शिवसेनेला भाजपवर हल्लाबोल याशिवाय शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘ते आले, त्यांनी पाहिलं, पण त्यांना त्यातलं किती समजलं माहिती नाही, कारण त्यांचा हा दौरा तासभरच होता. शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले होते, त्यांना बटाटे जमिनीवर लागतात का जमिनीखाली हे माहिती नाही. त्यांना शेतीतील काय कळणार? असे सूचक उद्गार पवारांनी उद्धव ठाकरेंबद्दल काढले होते,’ असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.