राजेंच्या विरोधात प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या जहरी टीकेवरून मराठा समाज आक्रमक

राजेंच्या विरोधात प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या जहरी टीकेवरून मराठा समाज आक्रमक

प्रकाश आंबेडकर व वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

  • Share this:

मुंबई, 8 ऑक्टोबर: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन या खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या जहरी टीका केली. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेनंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निदर्शने केली जात आहेत.

नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रकाश आंबेडकर व वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या बद्दल केलेल्या जहरी टीकेचा निषेध केला.

हेही वाचा...एक राजा बिनडोक तर दुसरा.., प्रकाश आंबेडकरांची उदयनराजे-संभाजीराजेंवर जहरी टीका

मराठा आरक्षण समितीकडूनही निषेध...

मराठा आरक्षणाच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला आहे. मात्र, 'एक राजा बिनडोक' या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितलं. आरक्षणासाठी मराठा समाजातील सर्व नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असंही सुरेश पाटील यांनी सांगितलं. मात्र, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचं सुरेश पाटील यांनी म्हटलं आहे.

साताऱ्याच्या गादीचा अवमान कदापि सहन करणार नाही- शंभूराजे देसाई

खासदार उदयनराजे भोसले हे बिनडोक आहेत. त्यांना भाजपने कसं काय खासदार केलं अशा प्रकारचं आक्षेपार्ह वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. यावर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांच्या बद्दल केलेले वक्तव्य निंदणीय आहे. संपूर्ण राज्यात छत्रपतींच्या गादीला मानणारे लोक आहेत. साताऱ्याच्या गादीचा अवमान खपवला जाणार नाही. त्यांच्यावरील टीका कदापि सहन केली जाणार नाही. त्यांच्यावरील ही टीका गैर आणि चुकीची असल्याच आहे, असं शंभूराजे देसाई यांनी म्हटलं आहे.

साताऱ्यात आंबेडकरांविरुद्ध घोषणाबाजी

प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर साताऱ्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. साताऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत 'उदयनराजे जिंदाबाद, प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद' अशी घोषणाबाजी केली.

परळीत निषेध...

प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर परळीमध्ये सुरू असलेल्या मराठा रोख ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध नोंदवला आहे. प्रकाश आंबेडकरांनी छत्रपतींच्या वारासदारांवर टीका करू नये असे आवाहन केलं आहे.

हेही वाचा...कृषी-कामगार कायद्यावरून काँग्रेस आक्रमक तर राष्ट्रवादी अजूनही वेट & वॉच भूमिकेत!

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी पुण्यात मोठी घोषणा केली. ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. मात्र, ही घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जहरी टीका केली.

उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांचा नामोल्लेख न करता 'एक राजा बिनडोक आहे, तर दुसऱ्यांचं आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर. त्यांना राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्रर्य वाटतं, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी घणाघात केला.

Published by: Sandip Parolekar
First published: October 8, 2020, 5:59 PM IST

ताज्या बातम्या