कृषी आणि कामगार कायद्यावरून काँग्रेस आक्रमक तर राष्ट्रवादी अजूनही वेट & वॉच भूमिकेत!

कृषी आणि कामगार कायद्यावरून काँग्रेस आक्रमक तर राष्ट्रवादी अजूनही वेट & वॉच भूमिकेत!

दिल्लीत चर्चा करून शरद पवार आपली भूमिका ठरवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 8 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात गुरूवारी पक्षाच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी आणि कामगार विधेयकबाबत शरद पवार यांनी या बैठकीत चर्चा केली. प्रत्येक मंत्र्याचं त्याबाबतचं मत जाणून घेतलं. मात्र, कृषी आणि कामगार विधेयकबाबत काँग्रेस टोकाची आक्रमक झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस वेट & वॉच भूमिकेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दिल्लीत चर्चा करून शरद पवार आपली भूमिका ठरवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा...संभाजीराजेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा

कृषी विधेयकाबाबत शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे. या कायद्यातील त्रुटी दूर करून राज्यात कायदा करता येईल का, यावर चर्चा केली. शरद पवार दिल्लीला निघाले असून तिथे या अनुषंगानं काही भेटीगाठी होण्याची शक्यता आहे.

चर्चा करून आपली भूमिका ठरवणार

सध्या मंजूर कामगार कायदा हा उद्योग आणि उद्योजकांच्या फायद्याचा आहेत. मात्र, यात कामगारांचं नुकसान होणार ही भूमिका पवारांची बैठकीत होती. या विधेयकांबाबत अजून चर्चा करून शरद पवार भूमिका ठरवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शरद पवार यांनी मंत्र्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना...

कोरोना काळ असल्यामुळे मंत्र्यांच्या फिरण्यावर बंधन आहेत. तरी लोकांशी संपर्क ठेवा, अशा सूचना शरद पवार यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत. कोरोना काळ संपल्यावर जिल्हा पातळीवर जनता दरबार सुरू करावे, ही सूचना शरद पवार यांनी मंत्र्यांना दिली.

काय म्हणाले अजित पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की, शरद पवार यांनी केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी आणि कामगार कायद्याबाबत आढावा बैठक घेतली. यावर पक्षाच्या मंत्र्यांशी चर्चा केली. कृषी आणि कामगार कायद्याबाबत पक्षाची काय भूमिका असायला हवी, यावर चर्चा केली. मात्र, दिल्लीत चर्चा करून शरद पवार आपली भूमिका ठरवणार आहे.

हेही वाचा...उद्धव ठाकरे आणि आदित्य बिहारला जाणार? शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

कोरोनाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, टेस्टिंगची संख्या वाढवण्यात आली आहे. बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, यात सातत्य टिकवण्याचे काम करावं लागणार आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात परतीचा पाऊस कोकण आणि विदर्भात पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे हीत काय आहे. यावर अधिक भर राहील असं देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: October 8, 2020, 5:07 PM IST

ताज्या बातम्या