मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुणे: CID पाहून रचला कट; संधी मिळताच वयोवृद्ध महिलेचा गेम, थरारक घटनेचं उलगडलं गूढ

पुणे: CID पाहून रचला कट; संधी मिळताच वयोवृद्ध महिलेचा गेम, थरारक घटनेचं उलगडलं गूढ

शालिनी सोनवणे असं हत्या झालेल्या 70 वर्षीय महिलेचं नाव आहे.

शालिनी सोनवणे असं हत्या झालेल्या 70 वर्षीय महिलेचं नाव आहे.

Murder in Pune: काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील हिंगणे येथील एका सोसायटीत एकट्या राहणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या (Old woman brutal murder) करण्यात आली आहे.

पुणे, 03 नोव्हेंबर: काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील हिंगणे येथील एका सोसायटीत एकट्या राहणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या (Old woman brutal murder) करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी वजनदार वस्तूने डोक्यात वार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. तसेच घरातील रोकड आणि दागिने देखील चोरीला गेले (Theft cash and ornaments) होते. संबंधित इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ही हत्या कोणी केली? याबाबत गूढ बनलं होतं. पण सिंहगड पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत हत्येचं गूढ उलगडलं आहे.

याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी 14 आणि 16 वर्षीय दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात (2 minor accused arrested) घेतलं आहे. संबंधित आरोपींनी सीआयडी मालिका पाहून चोरीचा आणि हत्येचा कट (Planned murder by watching CID) रचल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरलेली रोकड आणि दागिने जप्त केले असून त्यांना अटक केली आहे. मृत महिला दागिने आणि पैसे कुठे ठेवते, हे आरोपींना माहीत होतं. यातूनच आरोपींनी दोन महिन्यांपूर्वी महिलेच्या घरात चोरी करण्याची योजना आखली होती.

हेही वाचा-4दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेसोबत घडलं विपरीत;भयावह अवस्थेत आढळली महिला

त्यासाठी आरोपींनी महिलेच्या घराची खोटी चावी देखील बनवून घेतली होती. पण मृत महिला वयस्कर असल्याने ती घरातून बाहेर जात नव्हती. त्यामुळे आरोपींनी चोरीचा आणि हत्याचा कट रचला. त्यानुसार दोन्ही आरोपींनी 70 वर्षीय मृत शालिनी सोनवणे यांच्या घरात प्रवेश केला. दोन्ही मुलं मृत महिलेच्या ओळखीची असल्याने ते तिघंही घरात टीव्ही पाहत बसले. दरम्यान आरोपींनी अचानक वृद्ध महिलेला अचानक ढकलून दिलं. नाक आणि तोंड दाबून तिची निर्घृण हत्या केली.

हेही वाचा-मृत्यूच्या 1 तासआधी आईशी शेवटचं बोलली; ऐन दिवाळीत विवाहितेनं उचललं भयावह पाऊल

यानंतर आरोपींनी कपाटातील 93 हजार रुपयांची रोख रक्कम आणि 67 हजार 500 रुपयांचे दागिने चोरुन नेले. हाताचे ठसे उमटू नये म्हणून आरोपींनी हातात हातमोजे घातल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. कोणताही पुरावा हाती नसताना सिंहगड पोलिसांनी कसून तपास करत हत्येचा उलगडा केला आहे. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Murder, Pune