मराठी बातम्या /बातम्या /देश /

मृत्यूच्या 1 तासआधी आईशी शेवटचं बोलली; ऐन दिवाळीत विवाहितेनं उचललं भयावह पाऊल

मृत्यूच्या 1 तासआधी आईशी शेवटचं बोलली; ऐन दिवाळीत विवाहितेनं उचललं भयावह पाऊल

दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी एका 26 वर्षीय विवाहित तरुणीने आत्महत्या (Married woman commits suicide) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी एका 26 वर्षीय विवाहित तरुणीने आत्महत्या (Married woman commits suicide) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी एका 26 वर्षीय विवाहित तरुणीने आत्महत्या (Married woman commits suicide) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी एका 26 वर्षीय विवाहित तरुणीने आत्महत्या (Married woman commits suicide) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत महिलेनं कौटुंबीक कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. विशेष म्हणजे मृत महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईशी फोनवरून संवाद साधला (called mother and speak last time) होता. परंतु मुलीसोबतचा हा संवाद आईसाठी अखेरचा संवाद ठरला आहे. संबंधित तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही सुसाइड नोट लिहिली नाही. त्यामुळे आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

आत्महत्या करणाऱ्या 26  वर्षीय विवाहितेचं नाव रितू असून ती न्यू उस्मानपूर परिसरातील ब्रह्मपुरी भागातील गल्ली नंबर 12 मधील रहिवासी होती. मृत रितू हिचं 2017 मध्ये कर्मवीर नावाच्या युवकासोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघांना एक 3 वर्षांची मुलगी आणि दीड वर्षांचा मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. असं असताना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास रितून आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

हेही वाचा-बुलडाणा: हयात नसलेल्या महिलेला मिळाली लस; शतकोटी लसीकरणाचा आणखी एक सावळागोंधळ

रितून गळफास घेतल्याची माहिती पती कर्मवीर यांनी आपल्या सासुरवाडीला दिली. घटनेची माहिती मिळताच माहेरची मंडळी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलीसही घरी पोहोचले होते. पोलिसांनी माहेरच्या लोकांसमोर पंख्याला लटकलेल्या रितूचा मृतदेह खाली उतरवला. घटनेचा पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी रितूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सुसाइड नोट न सापडल्यामुळे रितूने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली? याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा-ऑनलाइन चर्चेला बळी पडून मुंबईतील मुलानं गाठला गोवा; मोबाइलमधून भलताच प्रकार उघड

यावेळी माहिती देताना रितूची बहीण सोनिया हिने सांगितलं की, आत्महत्या करण्यापूर्वी एक तास आधी सकाळी दहा वाजता रितूचा आईला फोन आला होता. यावेळी रितू फोनवर रडत होती. तसेच आपल्याला आयुष्याचा कंटाळा आल्याचंही तिने आईला सांगितलं होतं. पण आईने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर रडत रडत रितूने तसाच फोन ठेवला. यावेळी एका तासाने आपली मुलगी आत्महत्या करेल याची जराही कल्पना मुलीच्या आईला नव्हती. त्यानंतर अकराच्या सुमरास रितूने आत्महत्या केल्याची माहिती जावयाने फोनवरून माहेरच्या लोकांना दिली.

First published:

Tags: Crime news, Suicide