पालघर, 03 नोव्हेंबर: पालघर जिल्ह्याच्या खारेकुरण गावात एक अमानुषतेचा कळस गाठणारी खळबळजनक घटना घडली आहे. येथील एक विवाहित महिला गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता (Missing from last 4 days) होती. माहेरच्या नातेवाईकांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर, चार दिवसांनी संबंधित महिला मृतावस्थेत (Married woman found dead) आढळली आहे. अत्यंत क्रूरपणे तिची हत्या (Brutal murder) करण्यात आली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी तिचं डोकं आणि चेहरा दगडाने ठेचून (crushed head with stone) विद्रुप केला आहे. सोमवारी सायंकाळी एका शेतामध्ये तिचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरती पाटील असं संबंधित हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. मागील चार दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. सोमवारी सायंकाळी एका शेतात डोकं आणि चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आरती यांचा मृतदेह आढळला आहे. एकंदरीत मृतदेहाची अवस्था पाहता नराधमांनी अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. आरती याच्या हत्येचा सूत्रधार त्यांचा पती आणि सासरकडील मंडळी असल्याचा आरोपी माहेरच्या लोकांनी केला आहे.
हेही वाचा-कपलने Live Stream करत ठेवले संबंध; गायकाच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
मृत आरती यांचा 2019 मध्ये मनीष पाटील नावाच्या युवकासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस आनंदात गेल्यानंतर सासरच्या मंडळींकडून आरतीचा छळ सुरू झाला होता. सासरच्या छळाला कंटाळून आरती या आपल्या माहेरी नागझरी येथे आल्या होत्या. काही दिवस माहेरी राहिल्यानंतर, पती मनीष याने पुन्हा असा त्रास होणार नाही, असं आश्वासन देऊन आरतीला परत घरी घेऊन आला होता.
हेही वाचा-आजी-मामीसोबतची मस्करी जीवावर बेतली, नागपुरात 12 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू
त्यानंतरही आरती यांना सासरच्या मंडळींचा त्रास सुरू होता. दरम्यान, चार दिवसांपूर्वी अचानक मृत आरती घरातून गायब झाल्या होत्या. याप्रकरणी आरती यांच्या नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी सांयकाळी भयावह अवस्थेत आरती यांचा मृतदेह आढळला आहे. आरती यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी तेजस देसले नावाच्या 22 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पालघर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Palghar