नालासोपारा, 31 डिसेंबर : आतापर्यंत तुम्ही अनेक बंटी बबली पहिले असतील परंतु आरबीआयाचे (RBI letter) लेटर दाखवून आणि वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून कोट्यवधी गंडा घालणारे बंटी-बबली तुम्ही पाहिले नसतील. नालासोपाऱ्यातील (nalasopara) अशाच भामट्यांचा पर्दाफाश झाला आहे.कोट्यावधी रुपये घेऊन पसार झालेल्या बंटी बबलीला मनसेच्या (mns) कार्यकर्त्यांनी सापळा लावून, काळे फासून पोलिसांच्या स्वाधीन केले.
या बंटी-बबलीने RBI चे बनावट कागदपत्र तयार केली होती. त्यावर आरबीआय असं लिहून तब्बल 30 कोटी रुपये रक्कम लिहिली आहे. या हा पेपर पहिल्यानंतर कुणाचाही त्यावर विश्वास बसेल. पण हा पेपर जरी आरबीआयचा वाटत असला तरी तो बनावट होता. याच बनावट पेपरचा वापर करून नालासोपाऱ्यातील या बंटी बबलीने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला.
नालासोपाऱ्यातील सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करून या भामट्यांनी आतापर्यंत अनेकांकडून लाखो रुपये घेतले. नालासोपाऱ्यातील महिलांना रिझर्व्ह बँकेत आमचा फंड आला असून ते सोडवण्यासाठी पैशांची गरज असल्याच्या थापा मारायचे. तुम्ही पैसे दिल्यास रिझर्व्ह बँककडून फंड घेता येईल, अशी बतावणी हे दोघे मारीत होते. त्याबदल्यात 1 BHK फ्लॅट देण्याचे आमिष हे दोघे द्यायचे.
(अफगाणिस्तानमध्ये एका वेळच्या अन्नासाठी संघर्ष! पैशांसाठी अल्पवयीन मुलांची विक्री)
काही महिलांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून या भामट्यांना लाखो रुपये दिले. मात्र, पैसे परत करण्याची वेळ आल्यावर हे बंटी-बबली फरार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलांनी आचोळे पोलिसांकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी पीडित महिलांचं साध म्हणणे ऐकून न घेता त्यांचा दमदाटी करून पोलीस ठाण्यातून हुसकावून लावलं. अखेर पीडित महिलांनी मनसेकडे धाव घेवून कैफियत मांडली.
त्यानंतर महिलांना कोट्यवधी गंडा घालून पसार झालेल्या बंटी बबली बोगस अधिकाऱ्याला मनसेचे शहरसचिव रवी पाटेकर श्रद्धा राणे,तुषार पतंगे,संतोष गुरव,दिलीप नवाळे,सुभाष जाधव,विनिता गावडे,महेश पालांडे,जयेश मयेकर,संदेश पालांडे,मनोहर जानवलकर,राकेश लोखंडे यांनी शोधून काढले. त्यानंतर या भामट्या बंटी आणि बबलीच्या तोंडाला काळे फासून वरात काढून आचोळे पोलिसांच्या हवाली केले
('पक्षातील विरोधकांना धडा शिकवणार', नाना पटोलेंचा थेट इशारा)
राजकुमार पुजारी स्वतःला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकारचा वरिष्ठ अधिकारी असल्याच्या थापा मारीत होता मात्र त्याला त्याच्या पोस्ट विषयी विचारल्यावर त्याची बोबडी वळली.
पीडित महिलांची बोगस अधिकाऱ्याविरोधात आचोळे पोलिसांनी साधी तक्रार घेण्यास नकार दिला उलट, आम्हाला विचारून पैसे दिले होते का? असा सवाल पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी विचारला होता, असा आरोप फसवणूक झालेल्या महिलांना केला. मात्र, कॅमेरासमोर बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nalasopara