मराठी बातम्या /बातम्या /देश /'पक्षातील विरोधकांना धडा शिकवणार', नाना पटोलेंचा थेट इशारा

'पक्षातील विरोधकांना धडा शिकवणार', नाना पटोलेंचा थेट इशारा

'भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पाठीमागे राहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे.

'भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पाठीमागे राहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे.

'भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पाठीमागे राहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे.

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : विधानसभा अध्यक्ष निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यामुळे काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. राज्यपालांनी सही न केल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची (Assembly Speaker election) निवडणूक पुढे ढकलावी लागली. यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी थेट दिली गाठली आहे. तसंच,  'पक्षातील विरोधकांना लवकरच धडा शिकवला जाणार आहे' असा इशाराच पटोले यांनी दिला आहे. पटोले यांनी इशारा दिल्यामुळे पक्षातील विरोधक कोण आहे, अशी चर्चा रंगली आहे.

नाना पटोले यांनी आज दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. पण   सोनिया गांधी यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले यांनी पक्षातील विरोधकांना चांगलाच इशारा दिला आहे.

'भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पाठीमागे राहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटायला आलो होतो, पण काही कारणामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, पण त्या नाराज नाही काही, काही कारणाने भेट झाली नाही, असं पटोले म्हणाले.

(Happy New Year 2022 Messages: नववर्षाच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज)

'पक्षातील विरोधकांना लवकरच धडा शिकवला जाणार आहे. ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले आहे, अशांचा शोध घेऊन कारवाई केली जाईल. फेब्रुवारीमध्ये विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. काँग्रेसचाच अध्यक्ष होईल, असं पटोले म्हणाले.

तसंच, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमध्ये नारायण राणे यांनी साम,दामदंडचा वापर करून निवडणूक जिंकली आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली.

(नवीन वर्षात कपडे महागणार नाही; 12% कराचा निर्णय GST काऊन्सिलकडून मागे)

तसंच, २०२१ हे देशातील अन्नदात्यासाठी अत्यंत कष्टदायी व दुःखद असे ठरले. काळे कृषी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले असले तरी त्यासाठी शेतक-याला मोठा संघर्ष व त्याग करावा लागला. या संघर्षात ७०० शेतकरी बांधवांचा बळी गेला. अतिवृष्टी व अवकाळीने बळीराजाचे अतोनात नुकसान केले. सरत्या वर्षातील हे कठीण प्रसंग सरत्या वर्षाबरोबर संपू दे व बळीराजाला नवीन वर्षात भरभराट येवो, त्याला सुगीचे दिवस येवो, अशी प्रार्थना करून त्यासाठी प्रयत्न करुयात, असंही नाना पटोले म्हणाले.

First published:
top videos