Home /News /maharashtra /

Wadavani Nagar Panchayat Election: पंकजा मुंडेंना मोठा धक्का; निकवर्तीय राजूभाऊ मुंडे पराभूत, वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या खात्यात

Wadavani Nagar Panchayat Election: पंकजा मुंडेंना मोठा धक्का; निकवर्तीय राजूभाऊ मुंडे पराभूत, वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या खात्यात

Beed Wadvani Nagar Panchayat Election Result: बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत नगरपंचायतीवर आपली सत्ता स्थापन केली आहे.

बीड, 19 जानेवारी : नगरपंचायतींचे निकाल हाती येऊ लागले असून बीड जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना एक मोठा धक्का बसला आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत (Wadavani Nagar Panchayat) ही भाजपच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिसकावली आहे. वडवणी नगरपंचायत निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे नेते राजूभाऊ मुंडे (Rajubhau Munde) यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत एकूण 17 जागांपैकी 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला (NCP wins maximum seats) आहे. 3 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीने विजय मिळवला आहे तर भाजपने 8 जागांवर विजय मिळवला आहे. वडवणी नगरपंचायत निवडणूक निकाल भाजप - 08 जागांवर विजयी राष्ट्रवादी - 06 जागांवर विजयी राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी - 03 जागांवर विजयी एकूण जागा - 17 बीड जिल्ह्यातील नगरपंचायत एकूण निकाल जिल्ह्यातील 5 नगरपंचायतमधील 85 जागांसाठी निवडणूक आष्टी नगरपंचायत भाजप - 13 राष्ट्रवादी - 02 काँग्रेस - 01 अपक्ष - 01 एकूण - 17 ----------------- शिरूर कासार नगरपंचायत भाजप - 11 राष्ट्रवादी - 04 शिवसेना - 02 एकूण - 17 ----------------- वडवणी नगरपंचायत भाजप - 08 राष्ट्रवादी - 06 राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी - 03 एकूण - 17 ------------------ केज नगरपंचायत राष्ट्रवादी - शेकाप - 05 काँग्रेस - 03 जनविकास आघाडी - 08 अपक्ष - 01 एकूण - ------------------- पाटोदा नगरपंचायत भाजप - 09 भाजप पुरस्कृत - 06 महावि - 02 एकूण - 17 कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का सातारा जिल्ह्यात कोरेगाव नगरपंचायती निवडणुकीतच्या पुन्हा एकदा धक्कादायक निकाल पहायला मिळत आहे. नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना 13 जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मात्र 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. हा निकाल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे (Shahikant Shinde) यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना आमदार महेश शिंदे (Shiv Sena Mahesh Shinde) पुरस्कृत कोरेगाव शहर विकास पॅनलने सर्वाधिक म्हणजेच 12 जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पॅनललने अवघ्या चार जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकत कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनलची सत्ता आली आहे. कुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचा 'दे धक्का' कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत (Kudal nagar panchayat election result) शिवसेनेने सात जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला आहे. अशा प्रकारे शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकूण 9 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपने या निवडणुकीत 8 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने या ठिकाणी शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. दोन टप्प्यात मतदान आज मतमोजणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर त्यापूर्वी उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे पार पडली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Beed, BJP, Election, NCP, Pankaja munde

पुढील बातम्या