Home /News /maharashtra /

Koregaon Nagar Panchayat: कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का, शिवसेनेची एकहाती सत्ता

Koregaon Nagar Panchayat: कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का, शिवसेनेची एकहाती सत्ता

Satara Koregaon Nagar Panchayat: साताऱ्यातील कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून शिवसेना पुरस्कृत पॅनलने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

सातारा, 19 जानेवारी : सातारा जिल्ह्यात कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा धक्कादायक निकाल (Shocking result from Koregaon Nagar Panchayat election) पहायला मिळत आहे. नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना 13 जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मात्र 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. हा निकाल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे (Shahikant Shinde) यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना आमदार महेश शिंदे (Shiv Sena Mahesh Shinde) पुरस्कृत कोरेगाव शहर विकास पॅनलने सर्वाधिक म्हणजेच 12 जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पॅनललने अवघ्या चार जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकत कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनलची सत्ता आली आहे. एकूण जागा - 17 शिवसेना पुरस्कृत पॅनल - 12 जागा विजयी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल - 4 जागा विजयी दोन महिन्यांपूर्वी जिल्हा बँक निवडणुकीत पराभव दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीतही आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला होता. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना मोठा झटका बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. तर ज्ञानदेव रांजणे विजयी झाले होते. या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचा 'दे धक्का' कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत (Kudal nagar panchayat election result) शिवसेनेने सात जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला आहे. अशा प्रकारे शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकूण 9 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपने या निवडणुकीत 8 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने या ठिकाणी शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. दोन टप्प्यात मतदान आज मतमोजणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर त्यापूर्वी उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे पार पडली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Election, Satara, Shashikant shinde, Shiv sena

पुढील बातम्या