जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / निवडणूक आयोगाचा निकाल 50 टक्केच, आता प्रतिक्षा 21 तारखेची; सावतांनी सांगितला शिंदे गटाचा पुढचा प्लॅन

निवडणूक आयोगाचा निकाल 50 टक्केच, आता प्रतिक्षा 21 तारखेची; सावतांनी सांगितला शिंदे गटाचा पुढचा प्लॅन

तानाजी सावंत

तानाजी सावंत

निवडणूक आयोगाने जो पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत निर्णय दिला तो 50 टक्के इतकाच आहे. आता आम्हाला 21 फेब्रुवारीची प्रतिक्षा असल्याचं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

  • -MIN READ Osmanabad,Osmanabad,Maharashtra
  • Last Updated :

उस्मानाबाद, 18 फेब्रुवारी : शुक्रवारी निवडणूक आयोगानं मोठा निर्णय दिला आहे. अखेर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे. यामुळे शिंदे गटात उत्साहाचे वातावरण असून, आता शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रीया येण्यास सुरुवात झाली आहे. आजचा निकाल 50 टक्के आहे.  21 तारखेला पुढचा निकाल येणार आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल देखील आमच्याच बाजुनं लागेल अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. ते उस्मानाबादमध्ये बोलत होते. नेमकं काय म्हणाले सावंत?  निवडणूक आयोगाने आज जो पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत निर्णय दिला तो 50 टक्के इतकाच आहे, 21 तारखेला पूर्ण निकाल लागणार आहे. तोही आमच्या बाजुनं लागेल असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. हा निकाल आमच्यासाठी ऊर्जा देणारा असून, शिवसेना व भगवा हे दान निवडणूक आयोगानं आमच्या पदरात टाकलं आहे. आता यापुढील काळात बाळासाहेबांच्या विचाराने महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम करू असंही तानाजी सावंत यांनी यावेळी म्हटलं. हेही वाचा :  धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदेंचा मोर्चा काँग्रेस, राष्ट्रवादीकडं; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट जाधवांचा काँग्रेस, राष्ट्रवादीला टोला   दरम्यान दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार  प्रतापराव जाधव यांनी या निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना जाधव यांनी म्हटलं की, राज्यात राजकीय भूकंप निश्चित होणार आहे, मात्र हा भूंकप म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारारांचा शिंदे गट आणि भाजपात प्रवेशाचा असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात