मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी उतावळे झाले लोक, काही झाडावर चढले, तर काही.., अखेर पोलीसच बोलवावे लागले

VIDEO: गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी उतावळे झाले लोक, काही झाडावर चढले, तर काही.., अखेर पोलीसच बोलवावे लागले

उस्मानाबादमध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. तुळजापूर तालुक्यातील वडगाव येथील खंडोबा यात्रेत गौतमीने लावणी सादर केली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Osmanabad, India

उस्मानाबाद 05 डिसेंबर : गौतमी पाटील ही डान्सर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या गौतमी पाटीलवर आतापर्यंत अनेक स्थरातून टिकेची झोड उठली आहे. गौतमीच्या अश्लील डान्सची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरलही झाली होती. दरम्यान आता गौतमीच्या नव्या कार्यक्रमाचे व्हिडिओ समोर आले आहेत. या कार्यक्रमासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केलं असल्याचं पाहायला मिळतं.

गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत; पण यावेळी डान्समुळे नाही तर...

उस्मानाबादमध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. तुळजापूर तालुक्यातील वडगाव येथील खंडोबा यात्रेत गौतमीने लावणी सादर केली. यावेळी कार्यक्रम पाहण्यासाठी इतकी गर्दी झाली होती, की अनेकांनी चक्क झाडावर चढत गौतमी पाटील हिचा कार्यक्रम पाहिला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रेक्षकांनी हा डान्स कार्यक्रम पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली असल्याने तिला माघारी जाण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिसांच्या गाडीत बसून गौतमी परत गेली.

कोण आहे गौतमी पाटील?

गौतमी पाटील ही एक डान्सर आहे आणि तिला लावणी डान्सर म्हणून ओळखलं जातं. अनेक कार्यक्रमात गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवलं देखील जातं आणि त्यासाठी तिला मानधन देखील दिलं जातं. गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ Youtube, instagram, facebook वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. गौतमीच्या व्हिडीओची चर्चा होते. मात्र, काही व्हिडिओमधील डान्स स्टेप्समुळं गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली.

सोबत नाचणाऱ्या तरुणासोबत डान्सर तरुणीचं असं कृत्य; VIDEO पाहूनच चक्कर येईल

सप्टेंबर 2022 मध्ये गौतमी पाटीलने एका शोमध्ये आक्षेपार्ह स्टेप डान्स करून लोकांचे लक्ष वेधून घेतले.

गौतमी पाटीलच्या डान्स मूव्हमुळे सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आणि प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडीओ व्हायरल होत गेले. यानंतर अनेक लोक तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करु लागले आहेत.

First published:

Tags: Dance video, Gautami Patil