दिल्ली, 09 नोव्हेंबर : डान्सचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात काही प्रोफेशनल डान्सर्सचे तर काही हौशी डान्सरचे व्हिडीओ असतात. पण सध्या डान्सच्या एका प्रोग्रामचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वांना धक्का बसला आहे. आपल्यासोबत डान्स करणाऱ्या तरुणासोबत डान्सर तरुणीने जे केलं ते पाहूनच तुम्ही शॉक व्हाल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका ठिकाणी डान्सचा प्रोग्राम सुरू आहे. स्टेजवर काही तरुणी डान्स करत आहेत. त्यांना नाचताना पाहून काही लोक इतके उत्साही होतात की तेसुद्धा तरुणींसोबत डान्स करू लागतात. त्यांच्यामध्ये एक तरुण दिसतो आहे. हा तरुण आपल्याच धुंदीत नाचत असतो. तेव्हा डान्स करणारी तरुणी त्याच्याजवळ येते आणि त्याला आपल्या दोन्ही हातांनी धरून उचलते. त्याला हातात आडवं धरते आणि गरागरा फिरवताना दिसते.
हे वाचा - तरुणाने लग्नाच्या वरातीत केला असा भन्नाट डान्स; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
तरुणी त्या तरुणाला इतक्या वेगाने आणि इतका वेळ गोल फिरवते की पाहून आपल्यालाही चक्कर येते. मग तिच्या हातातील त्या मुलाचं काय झालं असेल, याचा विचार करूनही तुम्हाला धडकी भरली असेल. त्यांच्यासोबत नाचणारे इतर लोकही भीतीने बाजूला होता.
काही लोक तिथं येतात तेव्हा ती तरुणी गोल फिरण्याचं थांबते आणि त्या मुलाला लोकांच्या स्वाधीन करते. मुलाची अवस्था पाहाल तर त्याच्या शरीरात काहीच हालचाल दिसत नाही आहे.
बहुत women ☕ women ☕ करके हंसता था pic.twitter.com/B2ifuFwzjr
— Professor ngl राजा बाबू (@GaurangBhardwa1) November 7, 2022
@GaurangBhardwa1 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Dancer, Viral, Viral news, Viral videos