सांगली, 01 नोव्हेंबर : आपल्या डान्स आणि अदांमुळे नेहमीच चर्चेत असलेली गौतमी पाटील आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गौतमीचा डान्स म्हटला की तरुण मंडळी लांबवरचा प्रवास करुन तो पाहण्यासाठी येतात. तसेच ही मंडळी तिला सोशल मीडिया वर देखील फॉलो करतात. जेथे गौतमी आपले चांगले फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते. पण यावेळी सांगलीमध्ये बेडगेत गौतमी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांचा लावणीचा कार्यक्रम पार पडला. पण या कार्यक्रमात भलताच प्रकार घडला. तिच्या कार्यक्रमाच्या गर्दीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला, ज्यामुळे आता गौतमी पाटील चांगलीच चर्चेत आली आहे. सांगली जिल्ह्यातील बेडग इथं सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तिच्या या लावणी कार्यक्रमात तुफान गर्दी झाली. तरुणांनी तिच्या कार्यक्रमासाठी एकच गर्दी केल्यामुळे गोंधळ उडाला. जमलेल्या काही तरुण जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहत होते. हे ही पाहा : सोशल मीडियावर व्हायरल झालेली डान्सर गौतमी पाटील कोण आहे? पाहा Inside Story पण शाळेच्या कौलारू छताचा चुराडा झाला. प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली आणि शाळेची कौले फुटली. एवढंच नाहीतर तार जाळीच्या कंपाऊंडचेही नुकसान झाले. त्याचबरोबर ज्या झाडावर प्रेक्षक बसले होते. तेही झाडही कोसळले. गमंत म्हणजे, या लावणीच्या कार्यक्रमाने शिक्षकांनाही भान उरलं नाही. या कार्यक्रमात चक्क शिक्षक ही नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाले आहे. त्यामुळे आयोजक आणि शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी एमआयएमाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केली आहे. दरम्यान, कार्यक्रम परिसराच्या बाहेर एक मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. दत्तात्रय विलास ओमासे असे मृत तरुणाचं नाव आहे.
ओमासे हे गर्दीत खाली पडल्याने तुडविले गेले असण्याची शक्यता असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ओमासे यांच्या मृत्यूबाबत मिरज ग्रामीण पोलिसात त्यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.