Home /News /maharashtra /

विधवा महिलेसोबत सेक्स करताना केलं डिस्टर्ब; भूकेनं व्याकूळ आजीला निर्दयीपणे संपवलं, साताऱ्यातील घटना

विधवा महिलेसोबत सेक्स करताना केलं डिस्टर्ब; भूकेनं व्याकूळ आजीला निर्दयीपणे संपवलं, साताऱ्यातील घटना

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Murder in Satara: गावातील एका विधवा महिलेसोबत सेक्स (Disturb while doing sex) करत असताना भूकेनं व्याकूळ असणाऱ्या आजीनं घराचा दरवाजा ठोठावल्यानं संबंधित व्यक्तीनं वयोवृद्ध महिलेची निर्घृण हत्या (Old woman brutal murder) केली आहे.

    सातारा, 16 सप्टेंबर: गावातील एका विधवा महिलेसोबत सेक्स (Disturb while doing sex) करत असताना भूकेनं व्याकूळ असणाऱ्या आजीनं घराचा दरवाजा ठोठावल्यानं संबंधित व्यक्तीनं वयोवृद्ध महिलेची निर्घृण हत्या (Old woman brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सेक्स करत असताना अडथळा आणल्याच्या कारणातून नराधमाने वृद्धेला ही भयंकर शिक्षा दिली आहे. महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत घटनेचा उलगडा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित घटना सातारा जिल्ह्यातील वडूज येथील येलमरवाडी गावातील आहे. तर हिराबाई दगडू जगताप असं हत्या झालेल्या 70 वर्षीय आजीचं नाव आहे. त्या येलमरवाडीत एकट्यात राहात होत्या. काही वर्षांपूर्वी हिराबाई यांच्या पतीचं निधन झाल्यामुळे त्यांना कोणाचाही आधार उरला नाही. त्यामुळे त्या गावातील लोकांची छोटी मोठी कामं करत आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. तर कधी हाताला काम नाही मिळालं, तर त्या भीक मागून आपलं पोट भरत होत्या. हेही वाचा-नदीपात्रात नेत दोघांच्या मदतीनं सासऱ्याची पाण्यात बुडवून हत्या; जालन्यातील घटना दरम्यान, 12 सप्टेंबर रोजी हिराबाई या भूकेनं व्याकुळ झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या एका घराजवळ जाऊन घराचा दरवाजा ठोठावला. पण आरोपी नराधम हा संबंधित घरात एका विधवा महिलेसोबत शरीर संबंध प्रस्थापित करत होता. रात्री अचानक घरी कोण आलं, या भीतीनं आरोपीच्या काळजात धस्स झालं. त्यानं घराचा दरवाजा उघडला तर बाहेर एक भूकेनं व्याकूळ असणाऱ्या 70 वर्षांच्या आजी त्याला दिसल्या. तिने काही खायला मिळेल का? अशी याचना केली. हेही वाचा-आधी मेव्हणीला घेऊन पळाला, नंतर बायकोची आठवण आली म्हणून दोघांनी असा रचला प्लान पण शरीरसंबंध प्रस्थापित करण्यात अडथळा आणल्याच्या कारणातून आरोपीनं वृद्ध महिलेला घरात ओढून तिला काठीनं बेदम मारहाण केली. काठीनं मारहाण केल्यानं रक्तबंबाळ झालेल्या आजी काही क्षणातच निपचित पडल्या. त्यानंतर आरोपीनं गावातील बाळकृष्ण पोळ यांच्या घरासमोर महिलेचा मृतदेह टाकून दिला आणि घटनास्थळावरून फरार झाला. पण महिलेच्या डोक्यावर खोलवर झालेली जखम पाहून ही हत्या असल्याचं पोलिसांनी निश्चित केलं. याप्रकरणी पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली. हेही वाचा-महिलांवरील अत्याचारचं सत्र थांबेना; जालन्यात शाळकरी मुलीला फरफटत नेत बलात्कार तपास सुरू असताना 49 वर्षीय आरोपी तुळशीराम सखाराम बागल हा पोलिसांनी काहीही न विचारता मध्ये मध्ये बोलू लागला. त्यामुळे पोलिसांनी बागल याच्यावर संशय बळावला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बागलला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच, मृत महिलेच्या खूनाचा उलगडा झाला आहे. या घटनेचा पुढील तपास वडूज पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder, Satara

    पुढील बातम्या