मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नदीपात्रात नेत दोघांच्या मदतीनं सासऱ्याची पाण्यात बुडवून हत्या; जालन्यातील हृदय पिळवटणारी घटना

नदीपात्रात नेत दोघांच्या मदतीनं सासऱ्याची पाण्यात बुडवून हत्या; जालन्यातील हृदय पिळवटणारी घटना

(File Photo)

(File Photo)

Murder in Jalna: घरातील किरकोळ कारणातून एका जावयानं आपल्या सासऱ्याची अमानुष पद्धतीनं हत्या (Son in law killed father in law) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk
जालना, 15 सप्टेंबर: घरातील किरकोळ कारणातून एका जावयानं आपल्या सासऱ्याची अमानुष पद्धतीनं हत्या (Son in law killed father in law) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण याठिकाणी एका तरुणानं आपल्या सासऱ्याला नदीपात्रात नेऊन अन्य दोघांच्या मदतीनं पाण्यात बुडवून हत्या (Murder by drowning in river water) केली आहे. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी जावयासह अन्य एकाला पुण्यातून अटक (Accused son in law arrest) केली आहे. एका आरोपी फरार असून घनसावंगी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रमेश चिमाजी भारसाखळे असं हत्या झालेल्या सासऱ्याचं नाव आहे. ते परतूर जिल्ह्यातील खांडवी येथील रहिवासी आहेत. तर अरुण काशीनाथ आव्हाड असं आरोपी जावयाचं नाव आहे. मागील काही दिवसांपासून घरगुती कारणातून जावई आणि सासऱ्यात खटकत होतं. याच वादातून आरोपी जावयानं आपल्या दोन मित्रांशी संगनमत करत सासऱ्याच्या हत्येचा कट रचला. हेही वाचा-लोखंडी स्टॅण्डचे तीन घाव अन् खेळ खल्लास; 'ये शैतान मुझे तकलीफ दे रहा है' म्हणत.. दरम्यान 9 सप्टेंबर रोजी घरगुती कारणातून वाद झाल्यानंतर आरोपी जावई अरूण यानं आपल्या सासऱ्याला बाणा नदीच्या पात्रात घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं आपल्या दोन साथीदारांच्या मदतीनं सासऱ्याला नदीतील पाण्यात बुडवलं. नाकातोंडात पाणी गेल्यानं अवघ्या काही क्षणातच सासरे रमेश भारसाखळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हेही वाचा-बायकोनं केलेला अपमान जिव्हारी लागला; पुण्यातील तरुणानं उचललं टोकाचं पाऊल बाणा नदी पात्रात सासरे रमेश यांचा मृतदेह आढळल्यानंतर घनसावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला होता. त्यानंतर पोलिसांनी मृताची ओळख पटवण्याचा मृतदेहाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल केला. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची कसून तपासणी करत पोलिसांनी खऱ्या आरोपीला जेरबंद केलं आहे. पोलिसांनी आरोपी जावई अरुण आव्हाड याला पुण्यातून अटक केलं आहे. मुख्य आरोपीचा अन्य एक साथीदार मित्र अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेचा पुढील तपास घनसावंगी पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Murder

पुढील बातम्या