मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महिलांवरील अत्याचारचं सत्र थांबेना; जालन्यात शाळकरी मुलीला केसांना धरून फरफटत नेत केला बलात्कार

महिलांवरील अत्याचारचं सत्र थांबेना; जालन्यात शाळकरी मुलीला केसांना धरून फरफटत नेत केला बलात्कार

जालन्यात एका अल्पवयीन मुलीवर अमानुष पद्धतीनं बलात्कार करण्यात आला आहे. (File Photo)

जालन्यात एका अल्पवयीन मुलीवर अमानुष पद्धतीनं बलात्कार करण्यात आला आहे. (File Photo)

Rape in Jalna: जालन्यात एका अल्पवयीन मुलीवर अमानुष पद्धतीनं बलात्कार (Rape on minor girl) करण्यात आला आहे.

  • Published by:  News18 Desk
जालना, 15 सप्टेंबर: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या (Crime against women) घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. पुण्यातील अल्पवयीन मुलीव तब्बल तेरा जणांनी बलात्कार (rape on minor girl by 13 accused) केल्यानंतर, मुंबईतील साकीनाका येथे तर नराधमानांनी क्रूरतेचा कळस गाठला होता. आरोपीनं पीडितेवर बलात्कार करून तिच्या गुंप्तांगात लोखंडी रॉड घालत निर्भया बलात्काराची आठवण करून दिली. त्यानंतर ठाणे आणि अमरावती येथेही बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. यानंतर आता जालन्यात (jalna) देखील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape on minor girl) केल्याची घटना उघडकीस आली आहे. जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील देवगाव याठिकाणी एका शाळकरी मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका तरुणानं बलात्कार केला आहे. पीडित शाळकरी मुलगी आपल्या घरासमोर कोंबड्यांना दाणे टाकत असताना, नराधमाची तिच्यावर नजर पडली. त्यानंतर आरोपीनं पीडित शाळकरी मुलीला जबरदस्तीनं उचलून नेत तिच्यावर अत्याचाराचा कळस गाठला आहे. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा-पिंपरीत डिलिव्हरी बॉयकडून महिलेची छेडछाड, जबरदस्ती Kiss घेण्याचा प्रयत्न अनवर खान कादर खान पठाण असं संशयित आरोपीचं नाव असून तो देवगाव येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास पीडित शाळकरी मुलगी आपल्या घरासमोर कोंबड्यांना दाणे टाकत होती. दरम्यान आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं पीडित मुलीचे केस धरून तिला ओढत आपल्या घरात नेलं. हेही वाचा- पुण्यात अल्पवयीन मुलीचं धाडस; अत्याचारातून गरोदर राहिल्यानंतर गर्भपातास नकार, दिला बाळाला जन्म याठिकाणी आरोपीनं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेची माहिती पीडित मुलीच्या आईला मिळाल्यानंतर त्यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पोक्सोसह बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Rape on minor

पुढील बातम्या