• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • आधी मेव्हणीला घेऊन पळाला, नंतर बायकोची आठवण आली म्हणून दोघांनी असा रचला प्लान

आधी मेव्हणीला घेऊन पळाला, नंतर बायकोची आठवण आली म्हणून दोघांनी असा रचला प्लान

मुलीनेच आपल्या आईला आणि तिच्या प्रियकराला ब्लॅकमेल केलं आहे.

मुलीनेच आपल्या आईला आणि तिच्या प्रियकराला ब्लॅकमेल केलं आहे.

तरुणाने दोन घरं घेणार असल्याचं बायकोला वचन दिलं होतं. मात्र त्याआधीच धक्कादायक खुलासा झाला.

 • Share this:
  अहमदाबाद, 15 सप्टेंबर : गुजरातमधील (Gujarat Crime News) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) एक अत्यंत धक्कादायक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह मिळून मेव्हणीचा जीव घेतला. काही दिवसांपूर्वी हा तरुण आपल्या या मेव्हणीला घेऊन पळून गेला होता. मात्र पुढील सहा महिन्यात चक्र बदललं आणि मेव्हणीचा मृतदेह हाती लागला. या घटनेनंतर कुटुंबात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी पती-पत्नीला अटक केलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. (First he took sister in law and ran away then he killed her ) मेव्हणीला जिवंत नदीत फेकून दिलं द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोपी हितेंद्र पटेल याने आपवी पत्नी पुनीता हिच्यासह मिळून हा हत्येचा कट रचला. दोघांनी आधी पीडिता कोमल हिला बेशुद्ध केलं. त्यानंतर तिच्या तोंडावर मच्छर मारण्याचं औषध फवारलं. रश्शीने तिचे हात-पाय बांधले आणि नर्मदेत फेकून दिलं. पोलिसांची टीम गेल्या 9 महिन्यांपासून या प्रकरणात आरोपीचा शोध घेत होती. जानेवारी 2021 मध्ये कोमलचा मृतदेह अत्यंत वाईट परिस्थितीत नर्मदेच्या किनाऱ्यावर सापडला होता. तपासानंतर तिची ओळख पटवण्यात आली. हे ही वाचा-पतीचा तो शब्द लागला जिव्हारी; महिलेनं ब्लेडनं स्वतःची जीभ कापून रस्त्यावर फेकली पत्नीला सोडून मेव्हणीसोबत पळाला होता तरुण चौकशीदरम्यान आरोपीने सांगितलं की, 2019 मध्ये तो पत्नीला सोडून मेव्हणीसोबत पळाला होता. 6 महिन्यांनंतर तो पुन्हा घरी आला व त्याने पत्नीची मन वळवलं. यादरम्यान पत्नी आणि मेव्हणी या दोघांसह तो संपर्कात होता. त्याने पत्नीला दोन घर घेण्याचं वचन दिलं होतं. मात्र कोमल आणि आरोपीचं फार काळ पटू शकलं नाही. त्यानंतर आरोपीने कोमलचा जीव घेण्याचा प्लान केला. यामध्ये त्याने पत्नीचीदेखील मदत घेतली. कोमलला जीवंतच नर्मदा नदीत सोडून देण्यात आलं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: