वसई, 24 जून: हल्ली विवाह म्हणजे शाही सोहळा, भरघोस खरेदी आणि अमाप खर्च आलाच, पण या सर्व खर्चाला फाटा देत एका नवदाम्पत्यानं समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन अत्यंत थोडक्यात लग्न उरकून उरलेल्या पैशातून कोव्हिड सेंटरला चक्क 50 बेड भेट म्हणून दिले आहेत.
वसईत राहणारे एरिक लोबो (28) आणि त्याची नववधू मार्लिन तुस्कानो (27) यांचा 20 जूनला नालासोपारा (पूर्व) गास येथील गोन्सालो गार्सिया चर्चमध्ये खिश्चन परंपरेप्रमाणे विवाह पार पडला. कोरोनामुळे विवाहासाठी मर्यादा आल्यामुळे एरिक आणि मार्लिनचा विवाह सोहळा अगदी मोजक्या पाहुण्यांमध्ये पारंपारिक पद्धतीने पार पडला.
हेही वाचा......तर उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा का करावी, भाजप आमदाराचा सवाल
विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात आमदार क्षितिज ठाकूर, वसईचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार किरण सुरवसे हे सपत्नीक उपस्थित होते.
एरीक आणि मर्लिना या दोघांचा विवाह लॉकडाऊन पूर्वीच ठरलं होतं. मात्र, अचानक आलेल्या कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे मोठ्या धुमधडाक्यात विवाह करणं शक्य नव्हतं. पण आपल्या विवाहाची एक अविस्मरणीय आठवण राहावी, म्हणून एरिक आणि मार्लिन या नवदाम्पत्यानं विवाहाच्या दिवशीच कोव्हिड सेंटरला 50 बेड भेट म्हणून दिले आहेत. दरम्याान, वसईच्या ग्रामीण भागासाठी लवकरच 200 बेडचं कोव्हिड सेंटर सुरु करण्यात येणार आहे.
Maharashtra: Eric & Merlin, a couple from Vasai, Mumbai donated 50 beds to a quarantine centre on their wedding day. #COVID19 (23.06.20) pic.twitter.com/n5F8MuODSQ
हेही वाचा...याठिकाणी ग्रहणाआधी दिसले दोन सूर्य? वाचा व्हायरल PHOTO मागील सत्य
वसई-विरार परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णाणा बेड मिळणे कठीण झाले आहे. अशावेळी विवाहाचा आनंद साजरा करत असताना कोव्हिड रुग्णाच्या चेहऱ्यावर ही आनंद फुलवण्यासाठी लग्नाचा खर्च टाळून क्वारंटाईन सेंटरला 50 बेड दिलेल्या एरिक आणि मार्लिन या नवविवाहित जोडप्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.