...तर उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा का करावी, भाजप आमदाराचा सवाल

...तर उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा का करावी, भाजप आमदाराचा सवाल

आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान दरवर्षी मुख्यमंत्र्यांना सपत्नीक देण्याची परंपरा आहे.

  • Share this:

 

पंढरपूर, 24 जून: पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान दरवर्षी मुख्यमंत्र्यांना सपत्नीक देण्याची परंपरा आहे. मात्र, सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपूरात जर बाहेरील लोक, महाराज मंडळीना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी का करावी, असा भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपाळ पडळकर यांनी केला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर पत्रकार परिषदेत बोलत होते. सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटूंबास महापूजेचा मान द्यावा, अशी मागणी देखील आमदार पडळकर यांनी केली आहे.

हेही वाचा...करिनाची अखेर मालवली प्राणज्योत, आता कोरोना टेस्ट रिपोर्टची प्रतिक्षा

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची धनगर समाजाचा आक्रमक चेहरा आणि प्रभावशाली वक्तृत्व असलेला नेता म्हणून देखील ओळख आहे. धनगर समाजाला फडणवीस सरकारने तरतूद केलेले एक हजार कोटी सुद्धा महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत, असा आरोप देखील आमदार पडळकर यांनी केली आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत, अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केली आहे. शरद पवार नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले. कोकणात वादळानंतर गेले. पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. सगळा फार्स सुरू आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा..मोठी बातमी! ऑगस्टपर्यंत नाही सुरू होणार सामान्य रेल्वे? परिपत्रकातून दिले संकेत

धनगर समाजाला फडणवीस सरकारने तरतूद केलेले एक हजार कोटी सुद्धा महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत, असा आरोपही आमदार पडळकर यांनी केला.

First published: June 24, 2020, 1:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading