Home /News /viral /

याठिकाणी ग्रहणाआधी दिसले दोन सूर्य? वाचा व्हायरल PHOTO मागील सत्य

याठिकाणी ग्रहणाआधी दिसले दोन सूर्य? वाचा व्हायरल PHOTO मागील सत्य

आकाशामध्ये दोन सूर्य दिसले, असें जर तुम्हाला कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? पण सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये आकाशात एकाचवेळी दोन सूर्य दिसत आहेत.

    मुंबई, 24 मार्च : आकाशामध्ये दोन सूर्य दिसले, असें जर तुम्हाला कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? पण सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये आकाशात एकाचवेळी दोन सूर्य दिसत आहेत. गेल्या काही हे फोटो सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहेत. या व्हायरल होणाऱ्या पोस्टच्या मते आभाळात दोन सूर्य दिसले. पण ही पोस्ट 2015 मध्ये करण्यात आलेली आहे, आणि असे आढळून आले आहे की जेव्हा जेव्हा सुर्यग्रहण असते त्यावेळी ही पोस्ट व्हायरल होते. ही जुनी पोस्ट फेक आहे. यामध्ये फोटोशॉप केलेले फोटो नसले तरी ती फेक आहे. या फोटोंना 'हंटर्स मून' असं नाव देण्यात आले आहे. या फोटोमध्ये दोन सुर्यांचे आभास निर्माण झाला आहे. 30℃ तापमान असल्यामुळे वातावरणात बर्फाच्या स्फटिकांच्या अस्तित्वामुळे हा आभास निर्माण झाला आहे. काही वेळा 3 सूर्यांचा भ्रम देखील निर्माण होतो. (हे वाचा-पतंजलीने आणलं Coronil आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले Memes) ही पोस्ट 2019 मध्ये देखील व्हायरल झाली होती. त्यावेळी हा फोटो अमेरिका-कॅनडा बॉर्डवरील असल्याचा दावा करण्यात आला होता. हंटर्स मून किंवा ब्लड मूनच्या परिस्थितीत सूर्य लाल रंगाचा दिसतो. (हे वाचा-कोण सर्वात शक्तिशाली? हल्ला करणाऱ्या बिबट्याला कुत्र्याने लावलं पळवून,पाहा VIDEO)
    First published:

    पुढील बातम्या