Home /News /maharashtra /

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या; खूनाचं धक्कादायक कारण आलं समोर

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या; खूनाचं धक्कादायक कारण आलं समोर

Murder in Solapur: राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी एका शिवसैनिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी कट रचून नियोजन पद्धतीनं हत्या घडवून आणली आहे.

  मोहोळ, 16 जुलै: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणातून धुसफूस सुरू आहे. तिन्ही पक्षांकडून एकमेकांना डिवचणं सुरू आहे. पण अशात राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी एका शिवसैनिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी कट रचून नियोजन पद्धतीनं हत्या घडवून आणली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. बुधवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सतीश नारायण क्षीरसागर असं हत्या झालेल्या शिवसैनिकाचं नाव असून ते मोहळ शहरातील सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहेत. तर विजय सरवदे हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मृत सतीश क्षीरसागर आणि जखमी विजय सरवदे आपल्या दुचाकीवरून जात होते. दरम्यान मोहोळ शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाजवळून जात असताना. त्यांना एका टॅम्पोनं जोरदार टक्कर मारली. या घटनेत सतीश यांचा जागीच मृत्यू झाला. तर विजय सरवदे हे गंभीर जखमी झाले. हेही वाचा-साखळीसाठी सोन्यासारख्या मित्राचा गळा घोटला, मृतदेह सोफ्यात लपवला याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा अनिल फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे व भय्या असवले या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर टॅम्पोचालक भय्या असवले या तरुणास अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या या घटनेचा पुढील तपास करत असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. हेही वाचा-VIDEO: गुन्हेगाराच्या वाढदिवसाचे मुंबई पोलिसांकडून सेलिब्रेशन हत्येचं नेमकं कारण काय? लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, चार महिन्यांपूर्वी मोहोळमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. दरम्यान शहरातील प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये काही बोगस मतदार नोंदणी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी मृत सतीश क्षीरसागर आणि जखमी विजय सरवदे यांनी प्रांताधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती. संबंधित तक्रारीची दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी बोगस नावं कमी केली होती. याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात रोष होत्या. यातूनचं घटनेच्या चार महिन्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सूड उगवल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Maharashtra, Murder, NCP, Shivsena, Solapur

  पुढील बातम्या