Home /News /maharashtra /

साखळीसाठी सोन्यासारख्या मित्राचा गळा घोटला, मृतदेह सोफ्यात लपवला, भिवंडीतील थरकाप उडवणारी घटना

साखळीसाठी सोन्यासारख्या मित्राचा गळा घोटला, मृतदेह सोफ्यात लपवला, भिवंडीतील थरकाप उडवणारी घटना

धक्कादायक बाब म्हणजे, आपल्यावर संशय येऊन नये म्हणून या आरोपींनीही त्याच्या कुटुंबासोबत फिरून त्याचा शोध घेत होते.

भिवंडी, 15 जुलै : मौजमजा करण्यासाठी मित्राच्या (friend murdered) गळ्यातील सोन साखळी (gold chain) हिसकावून घेत असताना विरोध केला म्हणून दोन मित्रांनी आपल्याच मित्राची गळा दाबून खून केल्याची घटना भिवंडीमध्ये (bhiwandi)  घडली आहे. धक्कादायक म्हणजे, खून केल्यानंतर मित्राचा मृतदेह सोफ्यात लपून ठेवला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहम गजबे (वय 14) (soham gajbe) असं मृतकअल्पवयीन मुलाचे नाव आहे. तर अक्षय वाघमारे (24)  असं आरोपीचे नावे आहेत. मृतक सोहम हा कल्याण-पडघा मार्गावरील बापगाव येथील जय मल्हारनगरमधील एका इमारतीत कुटुंबासह राहत होता. बुधवारी दुपारच्या सुमारास आरोपींनी मृतक सोहमला भेटण्याच्या बहाण्याने बोलवून त्याला तो राहत असलेल्या परिसरातील एका इमारतीमधील बंद फ्लॅटमध्ये घेऊन गेले. त्यांनतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी खेचत असतानाच मृतक सोहमने विरोध केला. त्यामुळे दोघा आरोपींनी त्याची गळा आळवून हत्या करून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढली. आणि त्याचा मृतदेह त्याच ठिकाणी एका सोफ्यात लपवून ठेवला. त्यांनतर दोघानांही  मृतकची सोनसाखळी कल्याणातील एका सोनाराकडे 10 हजार रुपयात गहाण ठेवून त्यामधून मिळालेल्या पैश्यातून मैजमजा केली. बायकोच्या सौंदर्याचं रहस्य काय? चक्क हातोड्याने नवऱ्याने केला पंचनामा बुधवारी दुपारपासून सोहम बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या कुटुंबासह तो राहत असलेल्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सायंकाळपासून त्याचा कुटुंबाने शोध केला. धक्कादायक बाब म्हणजे, आपल्यावर संशय येऊन नये म्हणून या आरोपींनीही त्याच्या कुटुंबासोबत फिरून त्याचा शोध घेत होते. अखेर रात्रीच्या सुमारास एका बंद फ्लॅटचा दरवाजा उघडून त्यामध्ये शोध घेतला असता, त्याचा मृतदेह सोफ्यामध्ये लपवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला. पोटदुखी असताना ‘हे’ पदार्थ अजिबात खाऊ नका; वाढेल Infection त्यांनतर घटनेची माहिती पडघा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा करून सोहमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. आणि हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यावेळी नातेवाईकांने दिलेल्या माहिती व संशयातून सोहमच्या दोघमित्रांना ताब्यात घेतले आहे. सोहमच्या हत्येच्या 10 दिवसापूर्वीही आरोपींनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी मधील लॉकेट विकून मौज मजा केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर केवळ मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन मित्राची हत्या करण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. अधिक तपास पडघा पोलीस करीत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या