नागपूर, 11 जून : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांना पक्षाचं कार्यकारी अध्यक्ष केलं. राष्ट्रवादीमधल्या या फेरबदलांवरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी भाकरी फिरवली नाही तर धूळफेक केली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनीही फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फार लक्ष देत नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादीने भाकरी फिरवली आहे, याबद्दलचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. तेव्हा फडणवीस पहिले हसले आणि मग त्यांनी उत्तर दिलं. ‘याला भाकरी फिरवणं म्हणतात असं मला वाटत नाही. ही काही भाकरी फिरलेली नाही, ही धूळफेक आहे. पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. देशभरात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार व्हावा यासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं आहे. मात्र शरद पवारांनी आपल्याच कुटुंबातील व्यक्तीला कार्याध्यक्षपद दिल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे, त्यावर अजित पवारांनी पलटवार केला आहे.
🕝2.21pm | 11-06-2023📍Nagpur | दु. २.२१ वा. | ११-०६-२०२३📍नागपूर
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 11, 2023
LIVE | Media interaction https://t.co/MTpI6hfQbe
‘राष्ट्रवादीने काय करावं, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. ते राष्ट्रवादीची कार्यकारिणी, राष्ट्रवादीचे सभासद, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे आमदार-खासदार लोकप्रतिनिधी हे त्याबद्दलचा निर्णय घेतील. आमची आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे. टीका टिप्पणी करणं त्यांचं काम आहे,’ असं अजित पवार म्हणाले आहेत. ’…तर सत्तेला ठोकर मारायलाही आम्ही तयार’, फडणवीस स्पष्टच बोलले सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर राज्यातल्या सत्ताधारी भाजप शिवसेनेला टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे. सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला. या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनीही प्रत्युत्तर दिलं. ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी जरूर करावेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवारांनी भाकरी फिरवली त्यात पक्षातल्या 10 नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. मात्र सुप्रिया सुळे यांच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर करण्यात आलेल्या निवडीवरून राजकारण तापलं आहे.