जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबईतील डबेवाले आर्थिक अडचणीत, मदतीला धावून आले रोहित पवार!

मुंबईतील डबेवाले आर्थिक अडचणीत, मदतीला धावून आले रोहित पवार!

मुंबईतील डबेवाले आर्थिक अडचणीत, मदतीला धावून आले रोहित पवार!

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील डबेवाले मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑगस्ट: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील डबेवाले मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लॉकडाउननं अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. तर हातावर पोट असणाऱ्यांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात मुंबईतील डबेवाल्यांनाच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सरसावले आहे. आमदार रोहित पवार डबेवाल्यांसाठी निधी उभारला असून इतर नागरिकांनाही त्यांनी मदतीचं आवाहन केलं आहे. हेही वाचा.. राज्यात धार्मिकस्थळं, जीम सुरू होणार; संजय राऊत यांनी दिले संकेत! ‘मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहेत. काल त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे 5 हजार सदस्य असून, अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी त्यांनी एक निधी उभा केलाय. आपल्याच परिवारातील घटक असलेल्या या डबेवाल्यांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर फोटोवरील नंबरवर संपर्क करावा,’ असं आवाहन करणारं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

जाहिरात

राज्यातील आर्थिक परिस्थितीची चाकं कोरोना विषाणूच्या संसर्गात रुतून पडली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. मात्र, मुंबईतील चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहोचवण्याचे काम करणाऱ्या डबेवाल्यांचा व्यवसाय मात्र पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे डबेवाले मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हेही वाचा… SR Case: रिया चक्रवर्तीनं Instagram वर शेअर केला व्हिडीओ, म्हणाली… लॉकडाऊन लागू होऊन आता तब्बल पाच महिने झाले आहेत. आता तर डबेवाल्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात मुंबईतील डबेवाल्यांच्या अडचणी समजून घेत आमदार रोहित पवार यांनी मदत निधी उभा केला आहे. त्याचबरोबर नागरिकांनाही मदतीचं आवाहन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात