मुंबई, 27 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput death case) आत्महत्येप्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) अनेक आरोप केले जात आहेत. त्यात रिया चक्रवर्तीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे, असं रियानं म्हटलं आहे. एवढंच नाही तर तिनं मुंबई पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन तपास यंत्रणांना सहकार्य करू शकू, असंही रियानं म्हटलं आहे. हेही वाचा…. महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्डमधून धमकी, केली 35 कोटींची डिमांड! नेमकं काय म्हणाली रिया…? रियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ केला आहे. हा व्हिडिओ रियाच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमधला आहे. ‘हे माझे बिल्डिंग कंपाऊंड आहे. व्हिडिओमधील व्यक्ती माझे वडील इंद्रजित चक्रवर्ती (सेवानिवृत्त सैन्य अधिकारी) आहेत. ईडी, सीबीआय आणि विविध तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. परंतु माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. आम्ही याबाबत स्थानिक पोलिस स्टेशनला कळवलं आहे. मात्र, पोलिसांकडून आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही. तपास अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी देखील कोणतीही मदत मिळालेली नाही. हे कुटुंब कसे जगेल? मुंबई पोलिसांना मी विनंती करते की, कृपया आम्हाला संरक्षण द्यावे. जेणे करुन आम्ही तपास यंत्रणांना सहकार्य करू शकू. #safetyformyfamily कोरोनाच्या काळात मूलभूत अधिकार व सुव्यवस्था प्रदान करणे आवश्यक आहे. धन्यवाद.’ असंही रियानं म्हटलं आहे.
रियानं पहिल्यांदाच युरोप ट्रीप ते हार्ड ड्राइव्हबाबत केला मोठा खुलासा दुसरीकडे, सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं (Rhea Chakraborty) एका न्यूज चॅनलला मुलाखत दिली. ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत रियानं हार्ड ड्राइव्हबाबत मोठा खुलासा केला. रियानं सांगितले की, “मी सुशांतच्या घरी असताना हार्ड ड्राइव्हमधून कोणताही डेटा डिलीट केलेला नाही. मी गेल्यानंतर सुशांतची बहीण तिकडे गेली होती. त्यांना याबाबत विचारावे”. तसेच रियानं, “सुशांतला मी कधीच कंट्रोल केलं नाही. सुशांत मी येण्याआधीच त्याच्या घरात काम करणाऱ्या लोकांनी ओळखत होता. त्यामुळे मी घरातला स्टाफ बदलल्याचा आरोप चुकीचा आहे”. रियानं यावेळी आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचे सांगत सुशांतच्या वकिलांनी रियाचं पुरावे नष्ट केल्याचा आरोपही खोडून काढला. युरोप ट्रीपबाबतही रियानं केला खुलासा रिया म्हणाली की, “युरोपच्या प्रवासावर सुशांतने मला आणि प्रत्येकाला सांगितले की फ्लाइटमध्ये बसण्याची त्याला भीती वाटते कारण त्याला क्लॉस्ट्रोफोबिया आहे. त्यासाठी तो एक औषध घेतो. उड्डाण घेण्यापूर्वी त्यांनी स्वतः औषध घेतले”. तसेच युरोप ट्रीपबाबत केलेल्या खर्चाबाबत विचारले असता रियानं सांगितले की, “मी पॅरिसमध्ये एका कंपनीबरोबर शूट केले होते. कपड्यांच्या कंपनीचा एक फॅशन शो होता. यासाठी कंपनीकडून माझं बिझिनेस क्लासचं तिकिटं आणि हॉटेल याचं बुकींग झाले होते. त्यानंतर सुशांतने युरोप ट्रीप करण्याचा विचार केला. त्यानं माझे तिकिट रद्द करून स्वत: खर्च केला”. तसेच रियानं यावेळी सुशांतला किंग लाइफ जगायला आवडत असल्याचेही सांगितले. याआधी सुशांत आपल्या मित्रांसोबत थायलंडला गेला होता, त्यावेळी त्यानं 70 लाख खर्च केले होते. रियावर 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट केल्याचा आरोप मीडिया रिपोर्टनुसार, रियानं (Rhea Chakraborty) सुशांतचे घर सोडण्याआधी एका आयटी प्रोफेशनलकडून 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट करून घेतला होता अशी माहिती समोर आली आहे. सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीच्या सीबीआय चौकशी दरम्यान, त्यानं हा खुलासा केला. पिठानीनं सीबीआयला सांगितले की, डेटा डिलीट करताना सुशांत तेथे उपस्थित होता, त्यानं कोणताही विरोध केला नाही. मात्र पिठानीने त्या हार्ड डिस्कमध्ये काय डेटा होता, याबाबत त्याला माहिती नाही. याआधी रियानं 8 जून रोजी सुशांतचे घर सोडले होते, अशी माहिती होती. हेही वाचा… विराट-अनुष्कानं दिली GOOD NEWS! जानेवारी 2021ला येणार नवा पाहुणा रिया चक्रवर्ती विरुद्ध FIR दाखल ड्रग्जचा पुरवढा होत असल्याची माहिती मिळाल्याने Narcotics Control Bureau म्हणजे NCBने रिया विरुद्ध FIR दाखल केला असून त्यामुळे रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत आली आहे. सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) यांना ड्रग्जचा पुरवढा केला जात होता याचे पुरावे ईडी ला मिळाल्याचा दावा NCBचे संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे. त्यानंतर रिया विरुद्ध कलम 20, 22, 27, 29 NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.