जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Rohit Pawar : रोहीत पवार म्हणतात दहीहंडीतील गोविंदांच्या आरक्षणाच्या निर्णयाला विरोध नाही…

Rohit Pawar : रोहीत पवार म्हणतात दहीहंडीतील गोविंदांच्या आरक्षणाच्या निर्णयाला विरोध नाही…

Rohit Pawar : रोहीत पवार म्हणतात दहीहंडीतील गोविंदांच्या आरक्षणाच्या निर्णयाला विरोध नाही…

राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी दहीहंडीतील गोविंदांना खेळाडू कोट्यातून 5 टक्के आरक्षणाला विरोध केला आहे. पवार यांनी ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Rohit Pawar)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी दहीहंडीतील गोविंदांना खेळाडू कोट्यातून 5 टक्के आरक्षणाला विरोध केला आहे. पवार यांनी ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Rohit Pawar) दहीहंडीतील गोविंदाना खेळाडू कोट्यातून ५ टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला निर्णय हा आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येते. याबाबत अनेक विद्यार्थी आणि खेळाडूंनी फोन करुन त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली.

जाहिरात

आमदार पवार पुढे म्हणाल कि, राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध नाही, मात्र कुठलाही निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडित विषयांबाबत राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जाहिरात

अजीत पवारांचा राज्यसरकारला सवाल

विरोधी पक्षनेते पवार म्हणाले कि, गोविंदा पथके पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष आहे. ऑलिम्पिक मान्यता असलेल्या खेळाडूंना आपण आरक्षण ठेवले आहे. मात्र गोविंदांना आरक्षण देताना काय निकष ठेवणार? गोविंदा पथकामध्ये सर्वात वरच्या थरावर कमी वयाचा, वजनाचा मुलगा असतो.

जाहिरात

हे ही वाचा :  Dahi Handi 2022 : ‘उगाच डरकाळी फोडू नका, मुंबई कुणाच्या…’, वरळीतून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात!

अशा वेळी त्याचे काय क्वालिफिकेशन ग्राह्य धरणार? याची माहिती तुम्हाला कोण देणार? आता संगणकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. खेळाडू विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे रेकॉर्ड असते. इथे तसे काहीच नाही, असे अजित पवार म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात