मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Shocking! सावत्र मुलीसोबत मांडला तिसऱ्यांदा संसार; मात्र लग्नाचा भयावह शेवट

Shocking! सावत्र मुलीसोबत मांडला तिसऱ्यांदा संसार; मात्र लग्नाचा भयावह शेवट

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

अरवल, 18 ऑक्टोबर : बिहारमधील (Bihar Crime News) अरवलमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. यात एका व्यक्तीने पत्नीच्या मृत्यूनंतर सावत्र मुलीसोबत लग्न केलं. जेव्हा मुलगी दुसरं घर घेऊन राहू लागली तर आरोपीने अवैध संबंधाच्या संशयात तिची गोळी मारून हत्या (Crime News) केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सोबतच हत्येसाठी वापरलेली शस्त्रं जप्त केली आहे. (He married his stepdaughter and killed her)

आरोपीने केले तीन लग्न..

पोलिसांनी सांगितलं की, जलपुरा गावात राहणारे मकेश्वर रामाने तीन लग्न केली होती. त्यात एका पत्नीचा मृत्यू झाला होता, तर एक पत्नी पळून गेली. यानंतर आरोपीने आपल्या सावत्र मुलीसोबत लग्न केलं आणि तिला जबरदस्तीने स्वत:जवळ ठेवलं. मृत रानी देवीने त्याच्याजवळ राहण्यास नकार दिला. तिने अरवलमध्ये भाड्याने एक घर घेतलं आणि तेथे राहू लागली. ज्यानंतर आरोपीने विवाहबाह्य संबंधाच्या संशयात तिची गोळी मारून हत्या केली.

त्येनंतर आरोपी पळण्याच्या होता प्रयत्नात..

ही घटना घडल्यानंतर आरोपी आपल्या सायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणाहून गोळ्यंचा खोका सापडला आहे. दुसरीकडे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हे ही वाचा-अस्मानी संकटाने हाता-तोंडाचा घास हिरावला; औरंगाबादेत शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून एसपी राजीव रंजन यांनी सांगितले की, हत्येच्या आरोपीने तीन विवाह केले होते. ज्यात एक पत्नी मरण पावली तर दुसरी पत्नी पळून गेली. त्यानंतर त्याने आपल्या मुलीशी लग्न केले आणि तिच्यासोबत राहत होता. सध्या आरोपीला अटक करण्यात आली आहे, पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bihar, Crime news, Marriage, Murder