कल्याण, 18 ऑक्टोबर : धावत्या रेल्वेतून (Train) खाली उतरू नये किंवा त्यामध्ये चढण्याचाही प्रयत्न करू नये, अशी सूचना प्रत्येक प्लॅटफॉर्मवर दिली जाते (Train accident video) . या प्रकारे रेल्वेतून उडी मारल्यास कायमचं अपंगवत्व येण्याचा धोका असतो. तसेच प्रसंगी जीवही जावू शकतो. या सूचना सतत देऊनही अनेकदा या प्रकारच्या घटना घडतात. सध्या सोशल मीडियावरही अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. एका प्रेग्नंट महिलेने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. त्यावेळी तिला वाचवण्यासाठी आरपीएफ जवान देवदूतासारखा धावून आला (RPF jawan saved pregnant woman).
कल्याण रेल्वे स्टेशनवरील ही धक्कादायक घटना. धावत्या ट्रेनमधून उडी मारणारी प्रेग्नंट महिला ट्रेनच्या खालीच जाणार होती. त्यावेळी तिथं ड्युटीसाठी तैनात असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल यांनी तिला मृत्यूच्या दारातून खेचून काढलं आहे. ही घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
चालत्या ट्रेनमधून प्रेग्नंट महिलेने मारली उडी; आरपीएफ जवानाने वाचवला जीव pic.twitter.com/JygwwLG8QU
— News18Lokmat (@News18lokmat) October 18, 2021
चंद्रेश नावाची व्यक्ती आपली प्रेग्नंट पत्नी वंदनासह ट्रेनमध्ये चढली. त्यांना 02103 गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये चढायचं होतं आणि ते 02165 क्रमांकाच्या गाडीत चढले. गाडीत चढल्यावर ही आपली गाडी नाही हे त्यांना समजलं. पण तोपर्यंत ट्रेन सुरू झाली होती. त्यांनी घाईत धावत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उडी मारण्याचा प्रयत्न केला. आधी त्यांची प्रेग्नंट पत्नीने उडी मारली आणि ती प्लॅटफॉर्म कोसळली, ट्रेनच्या खालीच जाणार होती. पण सुदैवाने तिथं आरपीएफ जवान देवदूतासारखा धावत आला.
हे वाचा - भरधाव विमानाच्या पंखात आलं त्याचं डोकं आणि...; रन-वेवरील भयंकर दुर्घटनेचा धडकी भरवणारा VIDEO
आरपीएफ कॉन्स्टेबल एस आर खांडेकर त्याच प्लॅटफॉर्मवर ट्रेनच्या अगदी शेजारी होते. ते कुणाशी तरी बोलत उभे होते. इतक्यात ट्रेनमधून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दाम्पत्याला त्यांनी पाहिलं आणि त्यांनी लगेच धाव घेतली. महिला उडी मारत असतानाच त्यांनी तिला पकडलं. पण महिलेचा तोल जाऊन ती धाडकन प्लॅटफॉर्मवर कोसळली. तेव्हा त्यांनी तिला खेचत ट्रेनपासून थोडं दूर केलं. त्यामुळे सुदैवाने महिला आणि तिच्या पतीचाही जीव वाचला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Railway, Railway accident, Viral, Viral videos