मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रातलं सत्तांतर, राऊतांच्या अटकेवर मौन, राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रवादीचे नेते पहिल्यांदाच मातोश्रीवर!

महाराष्ट्रातलं सत्तांतर, राऊतांच्या अटकेवर मौन, राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रवादीचे नेते पहिल्यांदाच मातोश्रीवर!

गेल्या महिन्याभरातील राजकीय हालचाली पाहता आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. पण अजूनही राजकीय घडामोडी संपलेल्या नाहीयत.

गेल्या महिन्याभरातील राजकीय हालचाली पाहता आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. पण अजूनही राजकीय घडामोडी संपलेल्या नाहीयत.

गेल्या महिन्याभरातील राजकीय हालचाली पाहता आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. पण अजूनही राजकीय घडामोडी संपलेल्या नाहीयत.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 10 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दीड महिन्यात मोठी राजकीय उलथापालथ बघायला मिळाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं एकत्रित असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील नवं सरकार स्थापन झालं. या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार तब्बल 39 दिवस रखडलेला होता. अखेर या मंत्रिमंडळ विस्ताराला सोमवारचा मुहूर्त मिळाला आणि काल विस्तार झाला. त्यानंतर आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्याभरातील राजकीय हालचाली पाहता आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. पण अजूनही राजकीय घडामोडी संपलेल्या नाहीयत. कारण मुख्य शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या गोटात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ आज रात्री आठ वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचा समावेश असणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काळात राज्य सरकारला घेरण्यासाठी काय रणनीती आखायची किंवा सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाई संदर्भात सुरु असलेल्या सुनावणीविषयी या बैठकीत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. (मेट्रो-3च्या वाढीव खर्चाला मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीनंतर फडणवीसांनी दिली नवी 'डेडलाईन'!) विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे बऱ्याच मोठ्या घडामोडींनंतर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जात आहेत. मधल्या काळात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली. राऊतांच्या घरावर ईडीने धाड टाकली. त्यानंतर त्याचदिवशी रात्री उशिरा ईडीने राऊतांना अटक केली. राऊतांना अटक करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी नव्या सरकारवर सडकून टीका केली. पण राऊतांच्या अटकेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तितक्या टोकाची टीका केली जात नव्हती. राऊतांच्या अटकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: मौन पाळलं होतं. त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळल्याचं चित्र होतं. त्यामुळे संजय राऊत अटकेनंतर एकटे पडल्याची चर्चा जोर धरु लागली होती. या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मात्र राऊत यांची पाठराखण करत केंद्र सरकारवर टीका केली होती.
First published:

Tags: Ajit pawar, Shiv sena, Uddhav tahckeray

पुढील बातम्या