नाशिक, 28 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊसतोडणीच्या दरावर काल तोडगा काढला. त्यानंतर आज ते नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांचं नाशिक येथे आगमन झालं आहे. पण या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्यात घोषणाबाजी आणि विरोध करण्यास प्रतिबंध केला आहे. पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांना कलम 149 ची नोटीसा बजावल्या असून घरातच केलं स्थानबद्ध करण्यात आलं आहे. हेही वाचा… सर्वसामान्यांना आणखी एक झटका, कांद्यानंतर आता या तेलाच्या किंमती वाढणार कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेण्यासाठी शरद पवार हा दौरा करत आहे. शरद पवार त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. कांदा व्यापारांनी अघोषित संप पुकारल्यामुळे तोडगा काढण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करणार आहेत. त्याचबरोबर ते दिवंगत माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वना भेट घेणार आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेला कांदा व्यापाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहे. कांदा साठवणीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली आहे. यावर आता शरद पवार तोडगा काढतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची नाही… शरद पवारांनी मंगळवारी स्पष्ट केले होते की, मी नाशिकला जाणार आणि कांदा उत्पादकांना भेटून त्यांची भूमिका जाणून घेणार आहे. तसेच केंद्र सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचे ते म्हणाले आहेत. आयातीला पाठिंबा आणि साठा करण्यासाठी मर्यादा हे धोरण आहे. काय आहे केंद्र सरकारचं धोरण? 250 क्विंटल कांदा ठेवण्याची मर्यादा आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेला व्यापाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. याविषयी प्रत्यक्ष कोणतेही पत्र दिलेले नाही. मात्र अप्रत्यक्ष विरोध सुरुच आहे. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्यापाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हेही वाचा…प रतीचा पाऊस जीवावर उठला, शेतकऱ्यानं गळफास लावून संपवलं जीवन दरम्यान, लासलगावची उप बाजार समिती विंचूर येथे आज कांदा लिलाव झाला. प्रति क्विंटल 4800 रुपये भाव मिळाला. या व्यतिरिक्त पूर्ण नाशिकच्या बाजारपेठेत कांदा लिलाव बंद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.