परतीचा पाऊस जीवावर उठला, शेतकऱ्यानं गळफास लावून संपवलं जीवन

परतीचा पाऊस जीवावर उठला, शेतकऱ्यानं गळफास लावून संपवलं जीवन

अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झालं, संपूर्ण पीक गेलं, आता येणारी दिवाळी साजरी करायची कशी?

  • Share this:

बीड, 28 ऑक्टोबर: अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झालं, संपूर्ण पीक गेलं, आता येणारी दिवाळी साजरी करायची कशी? या विवंचनेतून बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव गावातील एका शेतकऱ्यानं गळफास लावून जीवन संपवलं.

बाळासाहेब किसन आंधळे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ अक्षरश: मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. आर्थिक विवंचनेतून शेतकरी जीवन संपवत आहेत.

हेही वाचा...नकोशी पुन्हा कचराकुंडीत! पुण्यात निर्दयी मातेनं नाळ ठेचून नवजात अर्भक फेकलं

मिळालेली माहिती अशी की, खळवट लिमगाव गावातील बाळासाहेब यांना दीड एकर जमीन होती. यात त्यांनी सोयाबीन आणि कापूस लागवड केली होती. मात्र, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक सगळं गेलं. येणारी दिवाळी सण आणि लोकांची देणी आणि बँकचे कर्ज कसं फेडायचं, या विवंचनेत बाळासाहेब आंधळे होते. त्यांनी मध्यरात्री 12 वाजता घराशेजारील चिंचाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

तसेच राज्य शासनाने जाहीर केलेले दहा हजार कोटींचे पॅकेज खरंच शेतकऱ्यांची उद्धवस्त झालेले संसार वाचवणार आहे का यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

शरद पवारांनी केला होता मराठवाड्याचा दौरा

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात मराठवाड्याचा दौरा केला होता. शरद पवार यांनी शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतल्या होत्या.

शरद पवार यांनी तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथील नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करून केंद्र सरकारकडे मोठी मदत मागणार असल्याचं आश्वासन दिलं होतं.

हेही वाचा...शिवसेना खासदार संजय जाधव यांना मारण्याचा कट, दिली होती 2 कोटींची सुपारी

दरम्यान, राज्यात कोकणसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठा प्रमाणात परतीच्या पावसामुळे भातशेती आणि पिके तसेच बागायतदारांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 28, 2020, 11:14 AM IST
Tags: beed

ताज्या बातम्या