नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : देशभरात सध्या कांद्याच्या वाढत्या किंमतींची चर्चा आहे. देशातील अनेक भागात कांद्याचे दर 70 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कांद्यानंतर आता मोहरीच्या तेलाचे (Mustard Oil) दरही वाढले आहेत. 2 ते 5 दिवसांत मोहरीच्या तेलावर 8 ते 15 रुपये प्रति किलोग्रॅम दर वाढले आहेत. मागील एका वर्षात मोहरीचं तेल 50 रुपये प्रति लीटरपर्यंत महागलं आहे. मोहरीचं यावर्षी कमी उत्पादन, ब्लेंडिग आणि तेलासाठी परराष्ट्र धोरणात झालेल्या काही बदलांमुळे हा परिणाम झाला आहे. गेल्या 4 दिवसांत प्रति क्विंटल मोहरीच्या दरात 300 रुपये वाढ झाल्याने, आता मोहरीच्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. सरकारने, मोहरीच्या तेलात इतर कोणत्याही तेलाची भेसळ करण्यावर बंदी घातली आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणद्वारा (FSSAI) मोहरीच्या तेलात भेसळीवर (Blending mustard oil) 1 ऑक्टोबरपासून बंदी घालण्यात आली. या निर्णयाचा फायदा ग्राहकांसह, मोहरी उत्पादक शेतकऱ्यांनाही होणार असल्याचं, सरकारचं म्हणणं आहे.
(वाचा - सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगच्या नंबरमध्ये बदल )
एका वर्षात 50 रुपयांची वाढ - किरकोळ तेलाचे व्यापारी हाजी इलियास यांनी सांगितलं की, 2019 च्या ऑक्टोबरमध्ये मोहरीच्या तेलाची 80 ते 105 रुपये लीटरपर्यंत विक्री होत होती. परंतु जानेवारीमध्ये पाम तेलावरील निर्बंधांमुळे एक लीटर मोहरीच्या तेलाचे दर 115 ते 120 रुपये लीटरवर पोहचले. दुसरीकडे 1 ऑक्टोबरपासून FASSI ने मोहरीच्या तेलात भेसळीवर बंदी घातली. त्यानंतर दर आणखी 10 ते 15 रुपये लीटर वाढले. मोहरीच्या दरात वाढ झाल्यानंतर, तेलाच्या दरातही वाढ झाली. ब्रँडेड मोहरीच्या तेलाचे दर बाजारात 130 ते 145 रुपये लीटरपर्यंत पोहचले आहेत. (वाचा - Loan Moratorium: चष्मा विकणाऱ्या या व्यक्तीमुळे झाला 16 कोटी लोकांचा फायदा ) फूड इंस्पेक्टर केसी गुप्ता यांनी सांगितलं की, एका प्रमाणात, मोहरीच्या तेलात मिसळल्या जाणाऱ्या दुसऱ्या तेल्यांच्या भेसळीला ब्लेंडिग बोललं जातं. आतापर्यंत मोहरीच्या तेलात 20 टक्क्यांपर्यंत, ब्लेंडिग होत होती. परंतु आता यावर बंदी घालण्यात आली आहे.