जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार; बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर? आव्हाडांना धक्का!

ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार; बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर? आव्हाडांना धक्का!

ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार; बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर? आव्हाडांना धक्का!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात नेहमीच बॅनर वॉर रंगते. आता पुन्हा ठाण्यात अशाच एका बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

  • -MIN READ Thane,Thane,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 जानेवारी :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात नेहमीच बॅनर वॉर रंगते. आता पुन्हा ठाण्यात अशाच एका बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राबोडी विभागाचे माजी नगरसेवक आणि ठाणे महापालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांचा आज वाढदिवस आहे. नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जातात सोबतच ते विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचे देखील विश्वासू आहेत. मात्र त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि माझी नगरसेवक राजन केणे यांचा फोटो लावण्यात आल्यानं राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.  बॅनरवर शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो     नजीब मुल्ला यांचा आज वाढदिवस आहे. नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त आज भल्या पहाटे ठाण्यातील मुंब्रा भागात बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनरवर अजित पवार, जितेंद्र आव्हाड किंवा अन्य कुठल्याही राष्ट्रवादीच्या नेत्याचा फोटो नसून, या बॅनरवर चक्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि माझी नगरसेवक राजन केणे यांचे फोटो आहेत. त्यामुळे आता नजीब मुल्ला  हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. हेही वाचा :  मोदींच्या दौऱ्यानंतर शिंदे गट, भाजपाची संयुक्त बैठक; अंतर्गत कुरघोडींना पूर्णविराम मिळणार ? कोण आहेत नजीब मुल्ला?  नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विश्वासू मानले जातात.  तसेच ते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. नजीब मुल्ला हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राबोडी विभागाचे माजी नगरसेवक आणि ठाणे महापालिकेचे गटनेते आहेत. वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरमुळे नजीब मुल्ला हे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात