मुंबई, 22 जून: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी कोरोनावर (Coronavirus) यशस्वीपणे मात केली आहे. आज (22 जून) रोजी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. हेही वाचा.. सुशांत सिंह आत्महत्या: पोलिसांच्या हाती लागली ‘ती’ कॉपी, 2 मित्रांची चौकशी होणार धनंजय मुंडे यांना पुढील 14 दिवस घरातच क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यानंतर ते लगेचच कामात रुजू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, बीड जिल्हा राष्ट्रवादीनं एक ट्वीट केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, धनंजय मुंडे यांच्याशी व्हिडीओ चाट केलं. ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. लवकरच आपलं काम सुरू करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. धनजंय मुंडे यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना 12 जून रोजी तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या 11 दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु होते. आता त्यांची प्रकृती ठिक आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. दरम्यान, या आधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
Had video chat with DM yesterday
— @Beed_Mirror (@Beed_Mirror) June 22, 2020
He’s fit & fine now
He’ll be home quarantined for few days & will be back to work very soon....@Dhananjay_munde @NCPspeaks pic.twitter.com/3yoYIDfjci
कोरोनातून लवकर बरा हो.. कुटुंबाची काळजी घे- पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झालेल्याचं समजताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करून प्रकृतीबाबत विचारपूस केली होती. ‘स्वतःची काळजी घे कुटुंबाची काळजी घे आई आणि मुली लहान आहेत. कोरोनामधून लवकर बरा हो, असं पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात पहिल्यांदाच संभाषण झालं. या संभाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. हेही वाचा.. अमित ठाकरे झाले आक्रमक, आधी अजित पवारांना पत्र; आता राज्यपालांची भेट!