सुशांत सिंह आत्महत्या: पोलिसांच्या हाती लागली 'ती' कॉपी, जवळच्या दोन मित्रांची चौकशी होणार

सुशांत सिंह आत्महत्या: पोलिसांच्या हाती लागली 'ती' कॉपी, जवळच्या दोन मित्रांची चौकशी होणार

आतापर्यंत पोलिसांनी 15 जणांचा चौकशी झाली आहे. पोलिसांनी सुशांतच्या जवळच्या दोन मित्रांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जून: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी (Sushant Singh Rajput Suicide) पोलिस चौकशी सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांनी 15 जणांचा चौकशी झाली आहे. पोलिसांनी सुशांतच्या जवळच्या दोन मित्रांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

सुशांतने एका बड्या प्रोडक्शन हाऊससोबत केल्या कॉन्ट्रॅक्टची कॉपी पोलिसाच्या हाती लागली आहे. पोलिस या संदर्भात तपास करत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या चौकशीत तिनं सुशांतच्या कॉन्ट्रॅक्टबाबत मोठा खुलासा केला होता. एका मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबतचे सर्व कॉन्ट्रक्ट सुशांत याने आधीच तोडले होते, असं रियानं सांगितलं होतं.

हेही वाचा.. 

दुसरीकडे, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील काही कलाकार, दिग्दर्शक यांना जबाबदार धरण्यात आलं आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर देखील आरोप केला जात आहे.

अभिनेत्री रिया आणि सुशांत रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जातं. ते दोघे काही काळासाठी एकत्र देखील राहत होते. दरम्यान सुशांतच्या मृत्यूनंतर बिहार कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुझफ्फरपूर याठिकाणी राहणाऱ्या कुंदन कुमार यांनी मुख्य न्यायिक दंडाधिकारी यांच्या समक्ष याचिका दाखल केली आहे. 24 जून रोजी यावर सुनावणी होणार आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात मुझफ्फरपूरमध्ये सीजीएमच्या कोर्टात ही दुसरी याचिका दाखल केली आहे. याआधी स्थानिक वकील सुधीर कुमार यांनी सलमान खान, आदित्य चोपडा, करण जौहर, संजय लीला भंसाळी आणि एकता कपूर विरोधात याचिका दाखल केली होती.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची मुंबई पोलिसांनी शुक्रवारी जवळपास 11 तास चौकशी केली. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. त्यामध्ये तिने सुशांतच्या शेवटच्या दिवसांबद्दल, त्यांच्या रिलेशनबद्दल आणि नैराश्याबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला होता.

हेही वाचा.. 

रियाने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतला मानसिक त्रास होता आणि तो त्यासाठी डॉक्टरांकडेही गेला होता. पण गेले काही दिवस तो डॉक्टरांनी दिलेली औषधं घेत नव्हता. तो आपले ताण-तणाव फार शेअर करत नसे. अशा वेळी तो एकटा राहणं पसंत करे. पुण्याजवळ पवना इथे त्याचं फार्म हाऊस होतं. तिथे जाऊन तो राहात असे. 6 जून रोजी सुशांतने रियाला घर सोडण्याबाबत सांगितले होते, तिने यावेळी त्याला वेळ देण्याचे ठरवले. त्यानंतर 14 जून रोजी सरळ त्याच्या मृत्यूचीच बातमी रियाच्या कानावर पडली होती.

First published: June 22, 2020, 12:51 PM IST

ताज्या बातम्या