मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ED, CBI हे त्यांच्या हातचं बाहुलं; छगन भुजबळ यांचा भाजपवर हल्लाबोल

ED, CBI हे त्यांच्या हातचं बाहुलं; छगन भुजबळ यांचा भाजपवर हल्लाबोल

मी जास्त बोलायला लागलो तर मलाही नोटीस पाठवली होती. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवारसाहेबांना (ED) नोटीस बजावली होती.

मी जास्त बोलायला लागलो तर मलाही नोटीस पाठवली होती. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवारसाहेबांना (ED) नोटीस बजावली होती.

मी जास्त बोलायला लागलो तर मलाही नोटीस पाठवली होती. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवारसाहेबांना (ED) नोटीस बजावली होती.

मुंबई, 24 नोव्हेंबर: 'मी जास्त बोलायला लागलो तर मलाही नोटीस पाठवली होती. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवारसाहेबांना (NCP Chief Sharad Pawar)अमंलबजावणी संचालनालयानं (ED) नोटीस बजावली होती. आता शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक (Shiv sena MLA Pratap Sarnike) यांचंही तसंच झालं आहे.

लोकशाहीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ही दडपशाहीच आहे. ED हे त्यांच्या हातचं बाहुलं, झालं आहे', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (NCP Leader Chhagan Bhujbal) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ED ची कारवाई ही 'ऑपरेशन लोटस'चा भाग असू शकते, असा आरोप देखील छगन भुजबळ यांनी केला आहे.

हेही वाचा...सुरुवात तुम्ही केली शेवट आम्हाला करता येतो, संजय राऊत भाजपवर भडकले

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यानंर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, काही महिन्यांपूर्वी मी भाजपविरोधात बोललो होतो. तर माझ्याविरोधात खटला भरण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवार यांनी भाजपविरोधी भाषण केलं म्हणून त्यांनाही ईडीनं नोटीस बजावली होती. मात्र, आता जनतेलाही माहित झालंय की भाजपविरोधात कुणी बोललं तर त्यांना त्रास देण्यासाठी EDचा वापर होत आहे, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी विखाली टीका केली आहे.

शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

ED,CBI हे भाजपच्या हातचं बाहुलं

छगन भुजबळ म्हणाले, ईडी (ED), सीबीआय (CBI)हे भाजपच्या हातचं बाहुलं आहेत. भाजपने संस्थांना हाताशी धरुन सत्तांतराचा कितीही प्रयत्न करु देत महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षे पूर्ण करणार तर पुढील निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचंच सरकार राज्यात स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. त्यांच्या 10 पेक्षा जास्त ठिकाणांवर ईडीने कारवाई सुरू केली. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ईडीच्या पथकाने सकाळी सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर घरातील सदस्यांची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर आता विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा...ईडीच्या कारवाईनंतर प्रताक सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील निवास्थानी आज सकाळी ईडीने धाड टाकली. आमदार प्रताप सरनाईक यांचे दोन्ही चिरंजीव विहंग आणि पुर्वेश यांच्या घरी आणि प्रताप सरनाईक यांच्या व्यावसायिक कार्यालयावरही ईडीने धाड टाकली.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Sharad pawar, Shiv sena