Home /News /mumbai /

सुरुवात तुम्ही केली शेवट आम्हाला करतो येतो, संजय राऊत भाजपवर भडकले

सुरुवात तुम्ही केली शेवट आम्हाला करतो येतो, संजय राऊत भाजपवर भडकले

'ईडीने त्यांचे कार्यालय हे भाजपच्या कार्यालयात थाटले आहे. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. अटक करायची तर खुशाल करा, आम्ही कुणाला घाबरत नाही. हा नामर्दपणा आहे. भाजपला लढायचे असेल तर समोरासमोर लढायला पाहिजे.

    मुंबई, 24 नोव्हेंबर : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. 'केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून सरकारवर दबाव आणता येईल असं वाटत असेल तर तो मुर्खपणा आहे. तुम्ही सुरुवात केली आम्हाला शेवट कसा करायचा हे चांगले माहिती आहे' अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. 'केंदीय तपास यंत्रणांचा वापर करून हे सरकार दबावाखाली येईल असं कुणाला वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. CBI, ED काही असू द्या, आम्ही सर्व कुणालाही शरण जाणार नाहीत. लढत राहू हे सरकार पुढे 25 वर्षे कायम राहील. एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू पाहत आहेत. त्यांनी लक्षात घ्यावे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, कितीही धाडे दाखल करा, खोटे पुरावे द्या, पण विजय हा सत्याचाच होत असतो' असं राऊत यांनी भाजपला ठणकावून सांगितले. 'तपास संस्थांचा वापर करून सरकारवर दबाव आणू इच्छित आहे. आमदारांचा विश्वास तोडू पाहत आहे. पण, त्यांनी हे लक्षात आणावे हा शिवरायांचा आमदार आहे. आता ही काळ्या दगडावरची रेष आहे. तुमचे सरकार येणार नाही. तुम्ही सुरुवात केली आम्हाला शेवट कसा करायचा हे चांगले माहिती आहे. ईडीने आमच्या आमदारांच्या खासदारांसमोर ईडीने कार्यालय थाटले तरी काही फरक पडणार नाही' असंही राऊत म्हणाले. सरनाईक यांनी कंगना रनौत, अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका मांडली होती. त्यामुळे ईडीने राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखे वागू नये. मी 100 लोकांची यादी ईडीला देऊ शकतो, त्यांच्याकडे बेनामी संपत्ती कशी येते याचा पुरावा देऊ शकतो. ईडी त्यांच्यावर कारवाई करेल का? असा सवालही राऊत यांनी विचारला. 'ईडीने त्यांचे कार्यालय हे भाजपच्या कार्यालयात थाटले  आहे. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. अटक करायची तर खुशाल करा, आम्ही कुणाला घाबरत नाही. हा नामर्दपणा आहे. भाजपला लढायचे असेल तर समोरासमोर लढायला पाहिजे. शिंखडी सारखं ईडी, सीबीआयचा आधार घेऊन लढायचा प्रयत्न  करायचा असेल तर आमचा विजय आहे' अशी टीका राऊत यांनी भाजपवर केली. 'तपास हा शांतपणे होऊ शकतो. पण तुम्हाला सरकारला त्रास द्यायचा, त्यांच्या कुटुंबीयांना त्रास द्यायचा. आमचा जन्म हा साम-दाम-दंड भेदातून आमचा झाला आहे.  हे एकदिवस तुमच्यावर उलटेल आता ही वेळ आली आहे, असा इशाराही दिला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या