Home /News /maharashtra /

ईडीच्या कारवाईनंतर प्रताक सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

ईडीच्या कारवाईनंतर प्रताक सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे.

    ठाणे, 24 नोव्हेंबर : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर दिल्ली येथील एका विशेष अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या  (Enforcement Directorate (ED) पथकाने छापा टाकला आहे. ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली. न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. 'मी सध्या मुंबईच्या बाहेर आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे. आज सकाळी 7.30 च्या सुमारास ईडीचे पथक ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या घरी पोहोचले होते. या पथकात 8 ते 9 अधिकारी आहे. त्याचबरोबर पुण्यातील सीआरपीएफचे पथक सुद्धा  तैनात करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे.  त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचे दोन्ही चिरंजीव विहंग व पुर्वेश यांच्या घरी आणि व्यावसायिक कार्यालयावरही ईडीने धाड टाकली आहे. प्रताप सरनाईक यांच्या सोबतच शिवसेनेच्या आणखी एका दिग्गज नेत्याला ईडीने नोटीस बजावल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरनाईक यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्याचा निषेध केला आहे. तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी या घटनेशी भाजपचा कोणताही संबंध नाही, असं स्पष्ट केले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या